Home गडचिरोली स्व. बिसनजी गेडाम सार्वजनिक वाचनालय व ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा संपन्न

स्व. बिसनजी गेडाम सार्वजनिक वाचनालय व ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा संपन्न

0
190

स्व. बिसनजी गेडाम सार्वजनिक वाचनालय व ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा संपन्न

चामोर्शी l सुखसागर झाडे

आज दिनांक 20/12/2025 ला स्व. बिसनजी गेडाम सार्वजनिक वाचनालय व ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यासिका मोहोर्ली मो येथे विधिवत पूजा करून दिगांबर पा. चौधरी पोलीस पाटील मोहोर्ली यांच्या शुभहस्ते वाचनालयाचे उदघाट्न करण्यात आले.
“गावं तिथे वाचनालयं” या संकल्पनेचा सल्ला सुधिरभाऊ शिवणकर सरपंच मोहोर्ली यांनी सुचवले असता त्यावर ताबडतोब अमलबजावणी सहाय्यक शिक्षक तथा जिल्हा अध्यक्ष हरीष गेडाम यांच्या पुढाकाराने तसेच मारोती आगरे यांच्या नेतृत्वाखाली व सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून या कार्याची सुरुवात करून सार्वजनिक वाचनालय तथा ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासीकाचे काम पुर्णत्वास करण्यात आला आणि मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राजेश ढुमणे सर मुख्याध्यापक त्यागमुर्ती सोनिया गांधी विद्यालय मोहोर्ली, हरिष गेडाम अध्यक्ष स्व बिसनजी गेडाम सार्व. वाच. मोहोर्ली, मारोती आगरे उपाध्यक्ष, दिगांबर चापले सचिव,बाळू कुसराम कोषाध्यक्ष ताराचंद साखरे,अविनाश जवादे शुभम जवादे, अतुल जवादे, प्रणय गेडाम, रविना गेडाम,भाऊराव मडावी, बोमावार जी, हरिष कुळमेथे, सचिन बोमनवार,सविता चरडुके, उमेद महादेव जवादे, जितेंद्र कुळमेथे व सर्व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!