घुग्घुस शहरात सामाजिक कार्यकर्ते व अपक्ष उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा का नाही..?
मतदार विचार करून मतदान करणार का? निवडणूकीत पैसा वाटणारे, विविध प्रकारचे लालच देणारे बरेच राजकीय पक्षातील उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वत:च्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा पैसा विरुद्ध कार्य हा प्रण पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घुग्घुस शहरात वर्षानुवर्षे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, संकटाच्या काळात धाऊन जाणारे, समाजासाठी झटणारे कार्यकर्ते निवडणुकीच्या वेळी मात्र मागे पडतात. तर पैशांची ताकद, गटबाजी आणि दिखाव्याच्या बळावर उमेदवार मैदानात उतरतात आणि निवडून येतात. त्यामुळे जाणकार मतदारांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. पैसे असेल तरच निवडणुक लडवावी का? अनेक ठिकाणी निवडणुकीचे स्वरूप खर्चीक होत चालले आहे. नीतिमत्ता ढासळत चालली आहे. प्रचारासाठी गाड्या, पोस्टर-बैनर, जेवणावळी, माणसे फिरवणे यासाठी लाखोंचा खर्च होत असल्याने ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही अशा कार्यकत्यांना सुरुवातीपासूनच स्पर्धेत अडचणी येतात. हेच कार्यकर्ते वर्षानुवर्षे सामाजिक कामात गुंतलेले असतात, लोकांच्या अडचणीत हजर असतात, पण मतदानाच्या वेळी मतदार तो चांगला माणूस आहे एवढे सांगतात, मत मात्र पैशावर किंवा गटबाजीत आधारलेल्या उमेदवारांना देतात, त्यामुळे खरे सामाजिक कार्यकर्ते निवडणुकीत कोलमडतात आणि पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणार्यांचा विजय होतो. लोकशाहीत मतदार राजा असतो, पण जर मतदारांनी सजगपणे विचार न करता पैशावर, लाभावर आधारित मतदान केले, तर विकासाच्या प्रश्नांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात.
निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात आणि नंतर ती वसूल करतात, ही कटू वस्तुस्थिती आहे.
समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्याना खरा पाठिंबा मिळावा यासाठी मतदारांनी आपली मानसिकता बदलण्याची आणि विकासाला प्राधान्य देणारे मतदान करण्याची गरज आहे.
निष्ठावंताने पक्षासाठी आयुष्यभर सतरंज्या उचलाव्यात, पण तिकीट मागु नये का ?
अनेक कार्यकर्ते आपल्या गावात, शहरात मतदारसंघात लोकांमध्ये काम करून नाव निर्माण करतात परंतु तिकीट वाटपच्या वेळी गटबाजी, आर्थिक ताकद, वरच्या स्तरावरील शिफारसी, राजकीय सौदे यांना प्राधान्य दिले जाते. परिणामी, जमिनीवर खऱ्या अर्थाने पक्षासाठी घाम गाळणारे कार्यकर्ते उपेक्षित राहतात. त्यांना तर ‘आपला आहेस’ या एका वाक्यात शांत केले जाते. हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे नेतृत्याची मानमरातब सांभाळतात, सभा सजवतात, पोस्टर लावतात, भार वाहतात, जनतेत प्रचार करतात, पण निर्णायक क्षणी त्यांच्यासाठी दरवाजे बंद होतात.
आता पहिल्यांदाच घुग्घुस नगरपरिषद निवडणुक होत आहे. आणि बरेच राजकीय पक्षाचे सक्रिय नेते ग्रामपंचायत सदस्य राहून गेले पण का केले! आणि पक्षाचे मोठे पद घेवुन अनेक नागरिकांना सांगण्यात येत आहे की मीच यांचे कामे केले, तो नागरिक मेला तरी त्या मरण्या मध्ये जावुन मनोगतातुन एहसान सांगायच्या आता पहिल्यांदाच जनता बघत आहे. जनता जनार्दन करिता तुम्ही कामे केले तर काही दिवसासाठी प्रचारापूर्ते रोजीच्या महिला का लावतात! रोजचे कार्यक्रम भोजनाचे का करतात! विविध प्रकारचे लालच का देतात! साम दाम दंड भेद वापरून फक्त आणि फक्त स्वहितासाठी निवडणुका कशा जिंकता येतील याची आखणी केली जाते. आणि निवडून आल्यानंतर जनतेला वाऱ्यावर सोडले जाते, अशी आता राजकारणाची पद्धत दिसून येत आहे.
आता जनता – जनार्दन ठरवणार, मतदान करून धडा शिकवणार का..? सामान्य कार्यकर्ता, अपक्ष उमेदवारांना मतदार मतदान करीत पाठिंबा देणार का..? हे निकाल लागल्यानंतर कळेलच..!








