Home गडचिरोली कोनसरी लाॅयल्ड-मेटल्स कंपनी च्या दलांलाचा सुळसुळाट

कोनसरी लाॅयल्ड-मेटल्स कंपनी च्या दलांलाचा सुळसुळाट

0
271

कोनसरी लाॅयल्ड-मेटल्स कंपनी च्या दलांलाचा सुळसुळाट

दडपशाही धोरणाचा अवलंब करीत शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा आखला जतोय डाव

 

कोनसरी (चामोर्शी तालुका) सुखसागर झाडे – लॉयड मेटल (Lyod Metal) कंपनीच्या कामामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावाला भीषण वळण लागले आहे. शेतकऱ्यांवर होत असलेल्या कथित दडपशाही, जमीन हस्तगत करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा खेळ, आणि वारंवार नोटिसांमुळे झालेल्या प्रचंड मानसिक तणावाचे भेदक परिणाम म्हणून दोन जणांचा अकस्मात मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांनी धक्कादायक आरोप पत्रकार परिषदेत केला आहे.
कोणसरीतील शेतकऱ्यांनी लॉयड मेटल कंपनीला शेती देण्यास ठाम नकार दिला आहे. “पिढ्यान्‌पिढ्या आमचा उदरनिर्वाह या जमिनीवर चालला आहे; हीच आमची खरी संपत्ती आहे, करोडो रुपयेही तिची भरपाई करू शकत नाहीत”, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.
मात्र तहसीलदार आणि एसडीओ हे शेतकऱ्यांच्या बाजूने न उभे राहता कंपनीच्या बाजूनेच बोलत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या गैरव्यवहाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“मृत व्यक्तीच्या नावावर बनावट ठराव?” — ग्रामस्थांचा आरोप
ग्रामस्थांनी सांगितले की, कंपनीकडून शेतजमीन मिळवण्यासाठी काही ठराव, कागदपत्रे आणि तडजोडीचे करार बनावटरीत्या तयार करून ठेवण्यात येत आहेत.
अत्यंत गंभीर आरोप असा की —
“ज्या व्यक्तीचे निधन झाले आहे, त्याच्या नावाने ‘सह्या’ दाखवून कंपनीला कागदपत्रे देण्यात आली”
असा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
या बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन कंपनीने जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप करण्यात आले.
नोटिसांचा पाऊस आणि मानसिक छळ
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही शेतकऱ्यांना —
वारंवार नोटिसा,
अधिकारी–दलालांचे अचानक धाडसदृश दौरे,
“जमीन द्या, नाहीतर कारवाई” अशा स्वरातील दबाव,
यामुळे शेतकरी कुटुंबांवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला.
याच तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.
“आम्हाला न्याय मिळाला असता, दडपशाही थांबली असती, तर हे जीव गेले नसते” — अशा भावनिक शब्दांत कुटुंबीयांनी आपली भूमिका मांडली.
ग्रामस्थांत संताप; मोठ्या आंदोलनाची तयारी
गावात तणावपूर्ण वातावरण असून ग्रामस्थ आता मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत.
त्यांची मागणी —
जमीन हडपण्याचा खेळ तत्काळ थांबवावा.
मृत्यू प्रकरणांची उच्च स्तरीय निष्पक्ष चौकशी व्हावी.
बनावट कागदपत्रांचा तपास करावा
प्रशासनाने ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहावे. अशी मागणी अन्याय ग्रस्त शेतकरी करीत आहे.
ग्रामस्थांचे स्पष्ट मत —
“जीवन आणि जमिनीवर अन्याय सहन करणार नाही. आम्हाला न्याय हवा, दडपशाही नव्हे.”
कंपनी व प्रशासनाच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा
या गंभीर आरोपांवर लॉयड मेटल अथवा प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
ग्रामस्थांनी केलेले आरोप अतिशय गंभीर असल्याने शासनस्तरावर चौकशी सुरू होण्याची मागणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!