Home गडचिरोली शिवाजी महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथे  “युनिटी मार्च” चे आयोजन

शिवाजी महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथे  “युनिटी मार्च” चे आयोजन

0
148

शिवाजी महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथे  “युनिटी मार्च” चे आयोजन

 

चामोर्शी, सुखसागर झाडे : दिनांक 25/11/025 ला सरदार वल्लभभाई पटेल जयंती व एकता दिवसाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन कार्यालय व मेरा युवा भारत गडचिरोली यांच्या संयुक विद्यमाने शिवाजी महाविद्यालय चामोर्शी येथे युनीटी मार्चचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीचे उद्दीष्ट समाजात बंधुता,एकता आणि संविधानिक मूल्ये दृढ करणे, नवीन पिढीपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीतील योगदानाची प्रेरणा जनसामान्यं नागरिकां पर्यंत पोहोचवणे.
नागरिकांमध्ये संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्याविषयी जागरुकता निर्माण करणे. युवकांना सक्रिय सुसज्ज व जबाबदार नागरीक बनवण्यासाठी प्रेरित करणे होते.
या रॅलीला मा.अरुण .एम सर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चामोर्शी , मा.सारंग मेश्राम सर जिल्हा युवा अधिकारी,मा.भास्कर घटाळे सर जिल्हा क्रिडा अधिकारी,मा.अविनाश गौरकार सर मुख्याध्यापक शिवाजी महाविद्यालय चामोर्शी,सौ.कांबळे मॅडम उपमुख्यध्यापीका शिवाजी महाविद्यालय, डॉ.प्रा.पंकज नरुले सर शिवाजी महाविद्यालय ,डॉ.प्रा.पवन नाईक सर हरडे महा. चामोर्शी. मा. पो. उपनिरीक्षक जंगले पोलीस स्टेशन चामोर्शी महाविद्यालय,मा.बडकेलवार सर क्रिडा कार्यालय,मा.दुबे सर ,कल्याणी गायकवाड मेरा युवा भारत गडचिरोली व इतर प्राध्यापक वृंद विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. उदघाटनप्रसंगी एकता व नशामुक्ती ची शपथ घेण्यात आली.
रॅलीला मा.अरुण .एम सर यांच्या हस्ते हिरावा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली,सोबत मा.श्री.सारंग मेश्राम सर,भास्कर घटाळे सर,तसेच विविध विभागाचे अधिकारी प्राध्यापक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही रॅली शिवाजी महाविद्यालय येथून सुरू होऊन हत्ती गेट व पुन्हा शिवाजी महाविद्यालय येथे येउन संपन्न झाली.
विद्यार्थ्यांनी रॅलीला शिस्थबद्ध व उस्फूर्त प्रतिसाद दिला
नंतर महाविद्यालयामधे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रदर्शन करीत उपस्थितांचे मन आकर्षित केले. या प्रसंगी उपस्थित अधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र वितरित गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!