Home चंद्रपूर अवैध रेती तस्करीला मोकळे रान, पूर्णविराम कधी लागेल..?

अवैध रेती तस्करीला मोकळे रान, पूर्णविराम कधी लागेल..?

0
261

अवैध रेती तस्करीला मोकळे रान, पूर्णविराम कधी लागेल..?

महसूल अधिकारी साहेब महसूल प्रशासन विशेष मेहरबान का..?

 

राजुरा, २२ नोव्हे. :- राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी सुरू आहे. मात्र यावर तालुका महसूल प्रशासन विशेष मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही या तस्करांच्या मुसक्या आवळण्यात कुचराई होत असल्याने नेमके पाणी कोठे मुरत आहे..? हा अनाकलनीय प्रश्न निर्माण झाला आहे.

विहीरगाव, कोहपरा, पंचाळा, सातरी, विरूर स्टेशन, सुब्बई, लक्कडकोट, कविटपेठ या गावासह संपूर्ण तालुक्यात दिवस रात्र पाळीत भरधाव ट्रॅक्टर रेतीची अवैध वाहतूक करताना दिसून येत आहेत. मात्र दिवसाढवळ्या व रात्रपाळीत होणारी रेतीची अवैध वाहतूक तालुका महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी तसेच स्थानिक तलाठी यांच्याच आर्थिक सलोख्यानेच होत असल्याची “री” नागरिकांत ओढली जात असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसून येत आहे.

केवळ स्व:खिसा गरम करण्यासाठी महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी लाखो रुपयांचा शासकीय महसूल घशात घालत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. भरधाव चालणाऱ्या ट्रॅक्टर व हायवा मुळे रस्त्यांचे पूर्णतः तीन – तेरा वाजले असून पर्यावरणाचे ही अतोनात नुकसान होत आहे. शिवाय नदी व नाले काठांची दुर्दशा होत आहे. महसूल प्रशासनाने अवैध रेती तस्करांच्या पायाशी लोटांगण घातले असल्याने भविष्यात आणखी तस्करांचे साम्राज्य वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अवैध धंद्यांना मोकळे रान मिळत असल्याने तस्करीला बरेच उधाण आले असून महसूल प्रशासन व जनप्रतिनिधींचा राजकीय वरदहस्त यामुळे राजुरा तालुक्यात अवैध धंद्यांना पूर्ण विराम लागेल का..? हा गहन प्रश्न ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!