Home गडचिरोली अवैध सुगंधित तंबाखू वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात पोलीस प्रशासनाला आले यश

अवैध सुगंधित तंबाखू वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात पोलीस प्रशासनाला आले यश

0
127

अवैध सुगंधित तंबाखू वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात पोलीस प्रशासनाला आले यश

चामोर्शी:- सुखसागर झाडे

चामोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 15/11/2025 रोजी अवैधरीत्या आरोग्यास अपायकारक सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे.

आज सकाळी ट्राफिक ड्युटी दरम्यान पोशि/६०५४ विनायक मस्कर यांना मा. पोनि दीपक डोंब यांनी फोनद्वारे माहिती दिली की आष्टीहून चामोर्शीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनामध्ये अवैध माल असल्याची शक्यता आहे. आष्टी पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता चामोर्शीच्या दिशेने पलायन केले.

ही माहिती मिळताच पोउपनि राजू वाघमारे, पोशि बनकर, चापोशि सहारे तसेच पोशि विनायक मस्कर यांनी तात्काळ शासकीय वाहनाने आष्टी टी-पॉईंट येथे जाऊन नाकाबंदी केली. काही वेळात संशयित वाहन भरधाव वेगाने दिसले; परंतु पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन मुलच्या दिशेने पळवले. पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला असता, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहन रस्त्यातच उभे आढळले. वाहन पाहताच दोन संशयित इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

वाहन क्रमांक TS20T9192 बाबत इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे चौकशी केली असता वाहन हे
मो. सलिम जावेद (मो. सतार हुसेन), रा. शिरपूर, आशिफाबाद, तेलंगणा याच्या नावावर असल्याचे समोर आले.

पंचांना उपस्थित करून वाहनाची तपासणी केली असता एकूण किंमत ₹१३,०२,९६५/- इतक्या किमतीचा खालीलप्रमाणे मोठ्या प्रमाणावर सुगंधित हुक्का तंबाखूचा साठा आढळून आला :

HOLA HUKKAH SHISHA TOBACCO – ९५० पॅकेट

EAGLE HUKKAH SHISHA TOBACCO (200g व 40g) – ८५८ पॅकेट

MAZAA NO.108 HUKKAH SHISHA TOBACCO – १०७ पॅकेट

बागबान URMIN NET 45g तंबाखू – ७५० डबे

वापरलेले पांढर्‍या रंगाचे टाटा इंद्रा V30 वाहन – किंमत सुमारे ₹६,००,०००/-

प्राप्त पंचनामा अनुसार नमुने सील करून वैज्ञानिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली यांना कारवाईसंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

याप्रकरणी अवैध तंबाखू वाहतूक केल्याबद्दल खालील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे :

कलम १२३, २२३, २७४, २७५, २८१ भा.न्या.सं. २०२३
सह कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३(१)(ZZ)(V) व ५९(१) अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी :_
१) मो. सलिम जावेद, रा. शिरपूर, आशिफाबाद, तेलंगणा
२) अनोळखी इसम, यांना ताब्यात घेत चामोर्शी पोलीस विभागाच्या वतीने सखोल पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!