राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या परंपरागत राजकीय प्रतिस्पर्ध्यांना लावले गळाला
मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोलीत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आव्हान
अहेरी (गडचिरोली) : सुखसागर झाडे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपला वरचष्मा दाखविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अहेरी चे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी भाजप काँग्रेस मधील नेत्यांसह आपल्या परंपरागत राजकीय प्रतिस्पर्ध्यांना लावले गळाला असे संकेत अहेरी विधानसभेच्या राजकीय वर्तुळात चर्चानां उत येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरु होताच गडचिरोली जिल्हयात राजकीय वातावरण तापायला सुरु झाले.. अन् पक्षबदलांचे वारे वाहू लागले.. मंत्रीपदावर वर्णी न लागल्याने धर्मराव बाबा कमालीचे दुखावले गेले.. अन् गडचिरोली जिल्ह्यात आपल्याला वजा करून कुणी राजकीय डाव टाकत असेल तर ते कदापी खपवून घेणार नाही अशा इशारा देत मुख्यमंत्र्याचे पालकत्व असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँगेसच्या फुटीर गटाच्या मातब्बर नेत्यांना हाताशी घेवून शिंदे गटाशी युती करत आपल्या उमेदवारांची घोषणा करून थेट भाजपला आव्हान दिले. कोरची पासुन सिरोंचा पर्यंत अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला आणि महायुतीमध्ये दबावतंत्राचा प्रयोग सुरू ठेवला… अहेरी राजघराण्याच्या प्रस्थापित राजेशाही विरुद्ध बंड करत सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करत एका सामान्य कुटुंबातून आलेल्या आदिवासी विद्यार्थी संघाचे नेतृत्व ज्यांनी 2009 साली धर्मराव बाबांचा पराभव करीत निवडणुक जिंकली .. मात्र निवडूण आल्यानंतर जनतेशी असणारी नाळ तुटल्यामुळे त्यांना सलग 2014,2019,2024 असे तीन टर्म पराभवाचा सामना करावा लागला असे धर्मराव बाबा यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी दीपक आत्राम हेही आता धर्मराव बाबांच्या तंबूत दाखल होण्याच्या चर्चा एका भेटीने सुरु झाल्या… अन् नगरपरिषद जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूकीत धर्मराव बाबा आपले नाणे खणखणीत कसे वाजेल या दृष्टीने नव्या राजकीय समीकरणांची सूरवात सुरु केली.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मुख्यमंत्र्याची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने देवेंद्र फडणवीस धर्मराव बाबांशी जुळवून घेतात की त्यांना आपल्या चाणक्य नीतीने शह देतात.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मोठी रंजक ठरणार आहे. आता लोह खाणींच्या अर्थकारणाचा जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव वाढला आहे. अशी कुजबुज परीसरातील नागरिकांमध्ये होत आहे.









