Home चंद्रपूर सावली तालुका भोई समाज संघटनेच्या अध्यक्षपदी क्रिष्णाभाऊ राऊत यांची निवड

सावली तालुका भोई समाज संघटनेच्या अध्यक्षपदी क्रिष्णाभाऊ राऊत यांची निवड

0
104

सावली तालुका भोई समाज संघटनेच्या अध्यक्षपदी क्रिष्णाभाऊ राऊत यांची निवड

भोई समाजाचा सर्वांगीण विकास करणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, विकासासाठी सदैव कटिबद्ध क्रिष्णाभाऊ राऊत यांचा मानस

 

सावली l प्रतिनिधी : दिनांक ०८-११-२०२५ सावली तालुका एकलव्य भोई समाज बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्षपदी युवा व उत्साही कार्यकर्ते श्री क्रिष्णाभाऊ राऊत यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सावली तालुक्यातील भोई समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राऊत यांचे नेतृत्व मान्य करण्यात आले. नुकत्याच झालेल्या दिनांक ०८-११-२०२५ ला व्याहाड बुज येथील एकोरी माता मंदिर येथे झालेल्या विशेष बैठकीमध्ये निवड करण्यात आली.
हि विशेष बैठक भोई समाजातील जेष्ठ कार्यकर्ते श्री एकनाथजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली या बैठकीमध्ये खालील प्रमाणे कार्यकारणी गठीत करण्यात आली.

श्री. राहुल भंडारे, व्याहाड खुर्द, सचिव
उपाध्यक्ष-
१) श्री. अमोल कांबळे, उपरी
२) श्री. प्रल्हाद भोयर, पेंढरी
३) श्री. सदानंदजी मारभते, निफंद्रा
४) श्री. नरेंद्र शेडमाके, पाथरी

सहसचिव-
१) श्री.संतोष गेडाम, उमरी, हरांबा
२) श्री. हरिभाऊ मेश्राम, भट्टीजांब
३) श्री. दिपक साखरे, सायखेडा
४) श्री. जनार्दन नागापूरे, मोखाळा
५) श्री. देवानंद भोयर, सामदा
६) श्री. संदीप भोयर, जिबगाव
७) श्री. संजय भोयर, विहिरगाव
८) श्री. नंदकिशोर माधव शिंदे, केरोडा
९) श्री. संतोष कस्तुरे, सावली

संघटक प्रमुख – श्री. नामदेव भोयर, व्याहाड बुज

प्रसिद्धी प्रमुख – श्री. बालाजी बावणे, साखरी

महिला कार्यकारिणी
सौ. सोनाली अरविंद भंडारे, अध्यक्ष
सौ. सीमा कमलेश ठाकरे, उपाध्यक्ष सौ. छायाताई दीपक शेंडे, सचिव
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर क्रिष्णा राऊत यांनी भोई समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संकल्प व्यक्त केले.
मागील कारकिर्दीचा त्यांचा राजकीय इतिहास बघितला असता क्रिष्णाजी राऊत यांनी पंचायत समिती सावली चे सभापती पदाची सूत्रे हाती घेतली असता पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांचा विविध पैलुने विकास साधण्यात सिंहाचा वाटा होता.
त्यांनी मागील पंचवार्षिक सत्रात भारतीय जनता पार्टीची धुरा सांभाळली होती सावली शहरासह गावपातळी पर्यंत आपल्या नावाचा डंका गाजवला होता.
आज ते आपल्या पंचायत समिती मनरेगा चे सहकारी जवळीक मित्र सन्मानमुर्ती नितीनभाऊ दुवावार यांच्या वैचारिक नेतृत्वाने प्रभावित होत, माननीय आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली कांग्रेस पक्षात प्रवेश घेत जनहिताचा, जन विकासाचा दृष्टिकोन उराशी बाळगून आज कांग्रेस पक्षाचे सावलीचे शहराध्यक्ष पदाची धुरा सुद्धा हाती घेतली आहे.
त्याच सोबतचं आपल्या समाजाचे सुद्धा नेतृत्व करण्यासाठी त्यांनी विळा उचलला आहे.
आपल्या भोई समाजाचा सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असे उपस्थित समाज बांधवांना आश्वासित केले आहे.
या बैठकीला सावली तालुक्यातील सर्व गावातील भोई समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवीन कार्यकारणीचे आभार व्यक्त केले.
या बैठकीचे सूत्रसंचालन मेश्राम सर प्रास्ताविक अरविंद भंडारे सर व आभार नामदेव भोयर यांनी मांनले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!