शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय येथे आंतरमहाविद्यालयीन बाॅल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आयोजित आंतर-महाविद्यालयीन बाॅल बॅडमिंटन स्पर्धेला चामोर्शीत उत्स्फूर्त प्रतिसाद
चामोर्शी : सुखसागर झाडे
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, चामोर्शीचे संस्थापक-अध्यक्ष मा. अतुलभाऊ गण्यारपवार आणि अध्यक्ष अजिंक्य अतुल गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात पार पडली.
स्पर्धेचे उद्घघाटन गडचिरोली सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव माननीय श्रीकांत पापडकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या कु. शिल्पा काशट्टीवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेश जोशी (स्पोर्ट्स डायरेक्टर, हरडे महाविद्यालय), कु. रूपाली पापडकर (कमिटी मेंबर, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया), आशिष निजाम (टेक्निकल कमिटी मेंबर, महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन), तानाजी बायस्कर (स्पोर्ट डायरेक्टर, वरोरा) आणि नितेश सावसाकडे (क्रीडा प्रमुख, शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय) यांच्या उपस्थितीने स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
बाल बॅडमिंटनपटूंचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाल्यामुळे स्पर्धेला रंगत आली. विविध महाविद्यालयांमधील खेळाडूंनी कौशल्यपूर्ण खेळी करत प्रेक्षकांची दाद मिळवली. तांत्रिक समिती व पंचांनी नियमावलीचे काटेकोर पालन करून स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली.
सदर बाॅल बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक गट (मुले)श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा तर द्वितीय क्रमांक आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, तर प्रथम क्रमांक गट( मुली) आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, तर द्वितीय क्रमांक श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा यांनी पटकवला. विजेता चम्मुंचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुयोग्य व्यवस्थापन व्यवस्थापक सुनिल व्हि. आभारे, सह-व्यवस्थापक प्रा. दगडू गुडदे, NIS प्रशिक्षक प्रसाद ताजणे तसेच महाविद्यालयाच्या प्रशिक्षकांनी सांभाळले. क्रीडा साहित्य, मैदान व्यवस्था, नोंदणी, निवास-भोजन यांसह संपूर्ण आयोजन कौतुकास्पद असे होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रा. बी. व्हि. धोटे, एनएसएस प्रमुख प्रा. नोमेश्वर झाडे, प्रा. नितेश सावसाकडे, प्रा. कुणाल आंबोरकर, कु. प्रा. डॉ. मीरा वाघमारे, प्रा. सुखसागर झाडे, संजय गडकर, लोभेश गोर्लावर, नितेश पोरटे, कु. भावना चांदेकर, कु. सूर मॅडम तसेच एनएसएस स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.









