घुग्घुस शहरात “मी”च होणार ” नगरसेवकांचा सुळसुळाट..?
ना राजकारणाचं ज्ञान, ना सामाजिक भान, ना प्रभागातील समस्यांची जाण..!
घुग्घुस येथे नक्की निवडणूक होईल की नाही, की अजून पुढे ढकलली जाईल, अशा संभ्रम अवस्थेत असताना अखेर घुग्घुस नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले. तसतसे शहराच्या अनेक भागात गल्लीबोळातून नवनवीन भावी नगरसेवकांची पैदास होऊ लागली आहे. ज्याच्याकडे राजकारणाचं ज्ञान नाही मात्र बापजाद्याचा अमाप पैसा किंवा राजकीय वारसा आहे. त्यांनाही नगरसेवक पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. २०२० ला नगरपरिषद घोषित झाली होती. त्याच्या बात-बात होणाऱ्या निवडणुका कोरोना मध्ये पुढे ढकलल्या गेल्या. मात्र त्यापुढे इतक्या ढकलल्या गेल्या कि कोर्टाला निवडणूक घेण्याचे आदेश काढावे लागले. मात्र नुकत्याच प्रभाग रचनाच्या आदेश आल्यानंतर अनेक इच्छुकांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. ‘काहींनी कार्यक्रम घेत, मी कार्यक्रम घेत आहे. माझी प्रसिद्धी होत आहे, आता मी भावी नगरसेवक, मला नगरसेवक करा. तर काहींनी प्रशासन व खासदार आमदार लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून होणारे काम हे कामे मीच केली आता मला नगरसेवक करा.’ तर काही नागरिकांच्या तक्रारीवर होणाऱ्या विकास कामांमध्ये अनेक भावी नगरसेवकांनी हजेरी लावली. फोटो काढले आणि ते कामे मीच करत आहे, असे वरचढ देखील चालू केली आहे. तर काही भावी नगरसेवकांना सामाजिक, धार्मिक, राजकीय कशाची जाण नसल्याने चार दोन फुकटे लुटारु कार्यकर्ते सोबत घेऊन, आता मी भावी नगरसेवक आहे, आता मी नगरसेवक होणारच असे स्वप्न देखील पडू लागले आहे. मात्र जनता अशा सर्व भावी नगरसेवकांना त्यांची जागा दाखवील. भावी नगरसेवकांची जी अवस्था आहे ती यंदाच्या निवडणूक लांबीमुळे माजी नेत्याचे कामे दिसत आहे का! माजी सदस्यांनी केलेली विकास कामे बिल्डर धार्जीनीने झाकून टाकली आहे.
तर काही माजी सदस्य तसेच बरेच राजकीय पक्षातील काही महिन्या अगोदर नवनियुक्त पद अध्यक्ष, महामंत्री, युवा अध्यक्ष, महिला शहर अध्यक्ष असे अनेक प्रकारचे पद मिळाले, स्वतःचा स्वार्थ साधत स्वतःचा खिसा कसा भरेल याकडे लक्ष दिले. जनता गेली उडत… मी पुन्हा होणार नगरसेवक अशी भावना माजी आणि भावी नगरसेवकांमध्ये दिसत आहे. नागरीकांच्या समस्या पेक्षा कार्यक्रम आणि खोट्या प्रसिद्धि वर जास्त भर देताना आजी, माजी भावी दिसत आहेत. शहरातील कोणत्याही प्रभागात गेलात तर त्या प्रभागातील चौकाचौकात, गल्लीबोळात अशा भुरट्या भावी नगरसेवकांचे फ्लेक्स जागोजागी झळकताना दिसतात. प्रभागातीलच पाच दहा बेरोजगार तरुण गोळा करून त्यांना सकाळचा चहा मिसळ आणि रात्रीची दारू पाजली की, कट्टर समर्थक, निष्ठावंत कार्यकर्ते लगेच मागे मागे फिरायला मिळतात. मग या भावींना आपण नगरसेवक असल्याचा फील देखील यायला सुरवात होते. विशेष म्हणजे हे सर्व भावी नगरसेवक ज्याप्रकारे पावसाळा आल्यावर लपलेली बेडकं बाहेर पडतात तशी फक्त निवडणूक जवळ आली की निवडणुकीपुरतीच बाहेर पडतात. दरम्यानच्या साडेचार वर्षांच्या कालावधीत हे कुठेच दिसत नाहीत. या अतिशयोक्तीचे चर्चामंच शहरातील नागरिकांकरीता सध्या तरी बनलेले दिसून येत आहे.
निवडणूक लवकरच लागणार. मात्र याच पार्श्वभूमीवर अनेक कामाचे निधी का येतात? अशीही चर्चा सुजाण नागरिकांत सुरू आहे. उद्घाटन करणे चालु होतात. दिखावा थाटण्यात येऊन मतदारांना फुस लावण्यात येते. केवळ आपली राजकीय पोळी शेकण्यात सारेच व्यस्त दिसून येतात. मात्र जनता जागरूक झाली असून शहरातील मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देईलच..!







