घुग्घुस परिसरातील चाय, टपरीवर नागरिकांची चर्चा..?
अस समाज माध्यमातून बोलण्यात येत आहे की,घुग्घुस शहरातील भाजप पक्षात नगरसेवकाची जागा वाटप करण्यात आली आहे का.. घुग्घुस शहरातील चाय, टपरीवर सर्वाधिक भाजप पक्षाची चर्चा परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. भाजप पक्षातील जेष्ठ नेते पासुन आजी, माजी ग्रा.पं. सदस्य तर नवनियुक्त पदाधिकारी एकत्रीत तर कधीच आले नाही पण नगरपरिषद निवडणूक लवकरच लागणार आहे. यामुळे भाजप पक्षाचे सक्रिय आजी, माजी व नवनियुक्त पदाधिकारी प्रसार माध्यमातून समाजात सकारात्मक पोस्टर्स बनवुन सोशल मिडियावर चालवत आहेत. अनेक प्रभागातील भावी नगरसेवक पोस्टर्स बनवुन सोशल मिडियावर चालवत आहेत. नागरिकांकडून दुकानात, रस्त्यावरील चाय, टपरीवर फक्त भाजप पक्षातील पदाधिकारी स्टंट का करत आहेत..?आमदार, जिल्हाध्यक्ष यांच्याकडून नगरसेवकांची जागा वाटप देण्यात आले आहे का?
पुन्हा भाजप पक्षातील जूने चेहेरेच नगरपरिषद निवडणूकीत उभे राहणार तर बाकीचे सक्रिय योगदान देणारे भाजप पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारीला संधी देखील मिळणार का नाही असेही बोलण्यात येत आहे. तसेच जुने चेहरे आतापर्यंत ग्रामपंचायत सदस्य राहुनही प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतापर्यंत नवीन आरोग्य केंद्र सुरू नाही, कासव गतीने सुरू असलेले पुलाचे बांधकाम झाले नाही, रस्त्यावरील गड्डे थातूरमातूर करीत आंदोलन करण्यात येतात, अश्यातच चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या अगोदरच शहर अध्यक्ष संजय तिवारी यांनी नगर परिषद सदस्य घोषित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असल्याने घुग्घुस भाजपात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे भाजपाचे शहर अध्यक्ष संजय तिवारी हे पक्षापेक्षा मोठे झाले आहे का..? असे नागरिकांत बोलले जात आहे.
भाजप शहर अध्यक्ष भावी नगर सेवक म्हणून उमेदवारांची पोस्ट समाज माध्यमात संजय तिवारी यांचे वतीने टाकण्यात येत आहे.
तसेच एका पोर्टल प्रसार माध्यमातून बातमी प्रकाशित झाली की, आमदरांच्या अगोदर शहर अध्यक्षाने केले नगरपरिषद सदस्यांची उमेदवारी घोषित!
पहिल्यांदाच शहरात दिसुन येत आले की,राजकीय पक्षाच्या नेत्यानी भावी नगरसेवक पोस्टर्स बनवुन सोशल मिडियावर व्हायरल करताना दिसुन येत आहे. पक्षानी टिकीट नाही दिली तर बंडखोरी करणार का? ही प्रश्न आहे.
परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून आमदार किशोर जोरगेवार काय निर्णय घेणार आहेत, जुने आजी, माजी नेत्याला नगरसेवक निवडणुकीत टिकीट देणार का! पहिल्यांदाच नवीन नागरिकांना, समाजसुधारक, बंधुभावकी का कार्यकर्त्याला टिकीट देणार?
सर्वाचे लक्ष वेधून कोणता निर्णय घेणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.









