आमदार भोंगळे यांच्या प्रयत्नाने चंद्रपूर सुब्बई बस सुरू
विभाग नियंत्रण सुटवणे आणि डी टी ओ व्यव्हारे यांचे मोलाचे व्यवस्थापकी योगदान
राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेले राजुरा तालुक्यातील विरुर स्टे हे सर्वात मोठे गाव असून विरुर परिसरात खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आहेत मोठे बाजार पेठ आहे सोबतच परिसरातील अनेक लोक जिल्ह्याच्या ठिकाणी जा ये करीत असतात परंतु जिल्ह्याच्या ठिकाणावरून किंवा थेट नागपूर येथून दवाखान्याचे व इतर कामे आठपून परत विरुर स्टे येथे येण्या करिता थेट एकही बस सेवा उपलब्ध नसल्याने परिसरातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, ही बाब राजुरा विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या लक्षात येताच त्यांनी विशेष लक्ष घालून चंद्रपूर विरुर स्टे सुब्बई बस सेवा सुरू करून दिली.
सदर बस चंद्रपूर येथून रात्री 7:20 वाजता सुब्बई साठी सुटणार आणि सकाळी सुब्बई येथून 6:35 वाजता चंद्रपूर साठी सुटणार असल्याचे चंद्रपूर येथील विभागीय नियंतक मा.सुटवणे मॅडम , डी. टी. ओ. पुरुषोत्तम व्यव्हारे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. रात्री राजुरा येथून 7:30 वाजता शेवटची बस असल्याने नागपूर चंद्रपूर येथून रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांना एकही बस उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते काही पर्यंत नसल्याने राजुरा चंद्रपूर येथे रात्री मुक्काम करावे लागत होते.
सदर बस सुरू झाल्यामुळे परिसरातील विद्यार्थी नागपूर येथून परत येत असताना एकही बस नसल्याची चिंता दूर झाल्याचे बोलले, उपचारासाठी चंद्रपूर नागपूर येथे रुग्णालयात गेलेले रुग्ण परत घरी येत असताना बस बदलणीवे आणि धावपळ करण्याची अडचण दूर झाल्याने अनेक रुग्ण आनंद व्यक्त करीत आमदार देवराव भोंगळे, विभागीय नियंत्रक सुटवणे, डी. टी. ओ. पुरुषोत्तम व्यव्हारे, आगार प्रमुख राकेश बोधे यांचे आभार मानले.









