घुग्घुस येथील शिवसेना (उ.बा.ठा.) प्रमोद महाजन मंच येथे आमरण उपोषण
अमराई वार्डातील भूस्खलनातांच्या न्यायासाठी सदैव सकारात्मक शिवसेना
वेकोली वणी क्षेत्राच्या घुग्घुस येथील भ्रष्टाचारामुळे अमराई वॉर्ड क्रमांक १ येथे झालेल्या भूस्खलनप्रकरणी पीडित नागरिकांनी न्याय मिळावा यासाठी आमरण उपोषण दुपारी १ : २० वाजता १३ ऑक्टोबर २०२५ सोमवार रोजी दुपारी प्रमोद महाजन मंच,आठवडी बाजार येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या उपोषणात शिवसैनिक (उबाठा गट) तसेच भूस्खलनग्रस्त कुटुंब सहभागी झाले असून शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात ही लढाई उभारली जाणार आहे.
भूस्खलनग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत
1) वेकोलीच्या भ्रष्टाचारामुळे प्रभावित अमराई वॉर्ड क्रमांक 1 मधील 160 कुटुंबांना हक्काची घरे द्यावीत. (2) भूस्खलनात घर गमावलेल्या मडावी परिवाराला योग्य मोबदला देण्यात यावा. (3) भूस्खलनग्रस्तांच्या यादीतून वगळल्या गेलेल्या 168कुटुंबांचा समावेश पुन्हा करण्यात यावा.
ऑगस्ट महिन्यात २०२२ रोजी अमराई वॉर्डात सुमारे ५० ते ६० फूट खोल खड्डा पडून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेत गजानन रामचंद्र मडावी यांचे संपूर्ण घर खड्ड्यात समाविष्ट झाले होते. त्यानंतर तीन वर्ष उलटून गेले तरी शासन आणि वेकोली प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या आमरण उपोषणास बसलेले पूनम वाघमारे, उमाताई मडावी, छाया पासवान,बेबी अनिल बेसरकर, ममता बहुराशी आणि अमित बोरकर यांचा समावेश असून या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील,असा इशाराही निवेदनात देण्यात आले आहे.








