भद्रावती क्रीडा संकुलातील धावण्याच्या ट्रॅक दुरुस्ती व प्रकाशयोजनेसाठी आम आदमी पार्टीची निवेदनाद्वारे मागणी

भद्रावती – आम आदमी पार्टी, चंद्रपूर तर्फे भद्रावती येथील क्रीडा संकुलातील धावण्याच्या ट्रॅकची दुरुस्ती व प्रकाशयोजना (लाईट सिस्टीम) बसविण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
भद्रावती क्रीडा संकुलात अनेक युवक-युवती दररोज सकाळ-संध्याकाळ व्यायाम, धावणे व विविध क्रीडा प्रकारांचा सराव करतात. मात्र सध्या धावण्याचा ट्रॅक अतिशय जीर्ण अवस्थेत असून सराव करताना खेळाडूंना अडचणी निर्माण होत आहेत तसेच इजा होण्याचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर संध्याकाळी पुरेशी प्रकाशयोजना नसल्यामुळे सराव करणे अवघड बनले आहे.
या पार्श्वभूमीवर भद्रावती येथील धावण्याच्या ट्रॅकची तातडीने दुरुस्ती करून ट्रॅकवर फ्लड लाईट्स बसविण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना आदित्य नंदनवार (युवा जिल्हा सचिव, आम आदमी पार्टी चंद्रपूर) यांच्यासोबत भोला/जांभुडे, प्रणय भास्कर इंगोले, शितिज शंकर राऊत, अनुराग मंगल भाटवलकर, आदित्य करमरकर, तेजस खोब्रागडे, अतुल डोंगरे, सागर पवार आणि विकस पाटील हे उपस्थित होते.








