Home गडचिरोली दुचाकीच्या समोरा-समोर झालेल्या अपघातात उपचारा दरम्यान ग्रामविकास अधिकारी यांचा मृत्यू…

दुचाकीच्या समोरा-समोर झालेल्या अपघातात उपचारा दरम्यान ग्रामविकास अधिकारी यांचा मृत्यू…

0
598

दुचाकीच्या समोरा-समोर झालेल्या अपघातात उपचारा दरम्यान ग्रामविकास अधिकारी यांचा मृत्यू…

 

चामोर्शी, सुखसागर झाडे
चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत मौजा कान्होली ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी गणपत तिम्माजी कोलते (५२ वर्ष) हे चामोर्शी वरुन आज सकाळी १० वाजेच्या सुमारास आपल्या मुख्यालयी ग्रामपंचायत कान्होली येथे कर्तव्यावर दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने मुरखळा वरुन आपल्या स्व:गावी परत जात असलेल्या दुचाकीचा मुरखळा माल रस्त्यावर अचानक समोरासमोर येत जबर धडक दिल्याने मोठा अपघात झाला.

सदर अपघात एवढा भयानक होता की, या अपघातात दोन्ही दुचालक कोसळून रस्त्यावर पडले. या अपघातात ग्रामविकास अधिकारी यांच्या डोक्याला, डोळ्यावरील भागात तसेच छातीवर जबर मार बसल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सदर मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे दाखल केले. रूग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात रेफर करण्यात आले.

जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे उपचारा दरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मावळली. शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून मर्ग दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे.

सदर घटनेची माहिती पोलीस विभागाला मिळताच घटनस्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस स्टेशन चामोर्शी पोलीस निरीक्षक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासना अंतर्गत घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!