Home गडचिरोली स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान मोठ्या थाटामाटात संपन्न

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान मोठ्या थाटामाटात संपन्न

0
162

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान मोठ्या थाटामाटात संपन्न

सेवा हाच संकल्प, भारत हीच पहिली प्रेरणा

चामोर्शी, सुखसागर झाडे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ या योजनेअंतर्गत सर्वांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला उद्घाटक आमदार डॉ. मिलींद नरोटे यांनी उद्घाटणीय सोहळा पार करीत उपस्थित नागरिकांना आरोग्य विषयक सल्ला देत मोलाचे मार्गदर्शन केले.

शिबिरामध्ये उपस्थितांसाठी खालील सेवा आणि तपासण्या उपलब्ध करून दिल्या होत्या : रक्तदाब आणि हृदयाचे मूल्यमापन, हिमोग्लोबिन तपासणी, रक्तातील साखर आणि पोषण स्थिती तपासणी, आरोग्य सल्ला व पोषण मार्गदर्शन सर्वांसाठी आरोग्य व कुटुंब कल्याणाशी संबंधित माहिती यावेळी देण्यात आली.

विविध विभागांतर्गत सेवा पंधरवडा कार्यक्रमाद्वारे सामान्य जनतेपर्यंत सेवा व योजना पोहचवण्यात आल्या.

नागरिकांच्या आरोग्याची जपणूक करून संपूर्ण कुटुंब अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न निश्चितच यशस्वी होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.

माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, निरज रामानुजनवार, नरेश अलसावार, साईनाथ बुरांडे, नगराध्यक्षा जयश्री वायललवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण किलनाके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महिन्द्र पेद्दाल्ला व सहकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!