Home चंद्रपूर 51 फूट उंच महाकाली महोत्सवाच्या ध्वजाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण,...

51 फूट उंच महाकाली महोत्सवाच्या ध्वजाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण, मातेची निघाली पालखी

0
142

51 फूट उंच महाकाली महोत्सवाच्या ध्वजाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण, मातेची निघाली पालखी

 

श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त महाकाली मंदिरासमोर 51 फूट उंच असलेल्या महाकाली महोत्सवाच्या ध्वजाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मातेची चांदीची मुर्ती मिरवणूक काडत श्री माता महाकाली महोत्सवाचे विश्वस्त राजु शास्त्रकार यांच्या निवास्थानी नेण्यात आली. यावेळी आमदार किर्तिकुमार भांगडिया यांची विशेष उपस्थिती होती. तसेच या प्रसंगी श्री माता महाकाली ट्रस्टच्या पदाधिकार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात सुंदर रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण परिसर सजविण्यात आला आहे. पाच दिवस चालणार्या या महोत्सवात विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात स्थानिक कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. तसेच महाकाली महोत्सवावर आधारित चित्रकला स्पर्धेचेही आयोजन या महोत्सवात करण्यात आले आहे.
दरम्यान, महाकाली मंदिरासमोर 51 फूट उंच ध्वज तयार करण्यात आला आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात भरणार्या यात्रेत व महाकाली महोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी येथे ध्वजारोहण केले जाते. यंदाही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्री माता महाकाली महोत्सव समितीची अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी, याचे विधिवत पूजन पार पडले. यावेळी माता भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!