Home गडचिरोली शासकीय अधिकारी व अनुलोममित्र मेळावा पंचायत समिती चामोर्शी च्या सभागृहात संपन्न

शासकीय अधिकारी व अनुलोममित्र मेळावा पंचायत समिती चामोर्शी च्या सभागृहात संपन्न

0
209

शासकीय अधिकारी व अनुलोममित्र मेळावा पंचायत समिती चामोर्शी च्या सभागृहात संपन्न

विवीध शासकीय योजनांची अधिकाऱ्यांकडून माहिती

 

चामोर्शी :- पंचायत समिती सभागृह चामोर्शी येथे शासकीय अधिकारी व अनुलोम मित्र मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर जुवारे साहेब प्रभारी गटविकास अधिकारी पंचायत समिती चामोर्शी, माधुरीताई अनूलोममित्र अधिकारी, तुषार करणे तालुका समन्वयक उमेद, हिवराज मेश्राम ए.पी.ओ.एम.आर.जी.एस., आर एस ठाकरे, संतोष जाधव उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, पी.आर.श्रीरामे विस्तार अधिकारी कृषी एस.व्ही.उईके सहाय्यक कृषी अधिकारी, अनिकेत झाडे, दर्शना सोडते रोशनी बुटे तालुका कृषी कार्यालय अधिकारी, अमित मोरांडे उपविभाग प्रमुख अनुलोम गडचिरोली, विनायक कुनघाडकर भाग जनसेक व योगिता सातपुते टि. एम.ओ. यांच्या हस्ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माला अर्पण व दीप प्रज्वलन करून करून करण्यात आले.

मंचा वरील सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे स्वागत हे अनुलोम मित्र व भाग जन सेवक यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. उपस्थित सर्व अनुलोम मित्र यांनी आपला स्वतःचा परिचय शासकीय अधिकाऱ्यांना करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक कुनघाडकर भाग जनसेवक गडचिरोली यांनी केले.

प्रास्ताविक अमित मोरांडे उपविभाग भाग जनसेवक गडचिरोली यांनी केले. अनुलोम संस्थेचा परिचय, आतापर्यंत शासकीय योजनांत केलेले कार्याची माहिती दिली. त्याचबरोबर अनेक योजनांची माहिती दिली व ‘अनुगामी लोकराज्य महाभियान’ या अंतर्गत होणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. अनुलोमच्या कार्यामध्ये अनुलोम मित्राचे सहकार्य बद्दल समजून दिले. संवादिनी संदर्भात सगळ्या अनुलोम मित्र आणि शासकिय अधिकारी यांना माहिती दिली.

सर्व अधिकारी यांनी अनुलोमच्या कार्याची व अनुलोम मित्र. शासनाच्या योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महान काम करीत आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा अनुलोम मित्रांना शासकीय योजना बाबत त्यांना मदत करू. अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.

अनुलोम मित्रांनी सक्रिय सहभाग घेतला प्रश्न उत्तरा मध्ये अधिक माहिती जाणून घेतली. अनुलोम मित्रांचा सहभाग पाहून अधिकाऱ्यांनी आपण आणखी पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन म्हणाले व अनुलोमच्या कार्याला शासकीय अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन काशिनाथ चिचघरे यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी व उपस्थित सर्व अनुलोम मित्रांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!