Home चंद्रपूर गोंडपिपरी येथे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांकरिता बससेवा सुरू करत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची अखिल भारतीय...

गोंडपिपरी येथे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांकरिता बससेवा सुरू करत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी

0
229

गोंडपिपरी येथे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांकरिता बससेवा सुरू करत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी

 

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी नगरात शिक्षणा करिता येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसेस गावापर्यंत येत नसल्याने नाहक त्रास होत आहे. मागील काही दिवसांपासून सतत बसेस ची मागणी केली असता मागणी पूर्ण होत नसल्याने विद्यार्थी नाराज होऊन काल १७ सप्टेंबरला तालुका दंडाधिकारी यांना निवेदन देत आंदोलन इशारा देण्यात आला आहे.

भंगाराम तळोधी जवळील पानोरा मार्गे शिवणी, नंदवर्धन, सुपगाव ह्या गावात रस्त्याची दुर्गती असल्यामुळे त्या गावात बस जाऊ शकत नाही. त्या मुळे विद्यार्थि गोंडपिपरी येथील महाविद्यालयात वेळेवर पोहोचू शकत नाहीत. त्याच सोबत अडेगाव ला चेकपिंपरी मार्गे जाणाऱ्या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले असल्यामुळे बस जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व भविष्यातील प्रगतीवर गंभीर परिणाम होत आहे. बस चालक व वाहक यांचा विद्यार्थ्या सोबत अत्यंत घृणास्पद व्यवहार आहे. विद्यार्थी परिषद कडून 15 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला असून जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर विद्यार्थी परिषद आंदोलन करेल अशा इशारा गोंडपिपरी नगर मंत्री अनिकेत कलगट्टीवार यांनी यावेळी दिला. सदर निवेदनाची तातडीने तालुका दंडाधिकारी यांनी दाखल घेत २४ सप्टेंबरला सबंधित विभागाला माहिती देऊन आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विद्यार्थ्यांकरिता सुरळीत बससेवा व मार्गावरील पडलेले खड्डे यावर उपाययोजना करण्याकरिता योग्य पावले उचलण्यात येतील अशी आशा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!