जिल्हा महिला बाल विकास विभागातर्फे चंद्रपूर जिल्ह्यात पंधराशे ग्रामपंचायती अंतर्गत अंगणवाडींना बालग्राम संरक्षण समितीचे प्रशिक्षण पूर्ण
चंद्रपूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्यावतीने जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर मिशन वात्सल्य योजनेच्या अंतर्गत जिल्हास्तरावर बालग्राम संरक्षण समितीच्या स्थापनेच्या संदर्भात तसेच स्थापित ग्राम बाल संरक्षण समिती पुनर्गठीत करण्याचे उद्देशाने मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 तसेच बालकांचे कायदे व बालकांसाठी असलेल्या योजनांचे प्रभावीपणे जनजागृती व अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या 1500 अंगणवाडी सेविकांना बाल न्याय अधिनियमाच्या अंतर्गत लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 (pocso) बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006, दत्तक विधान दत्तक प्रक्रिया, बालमजुरी, मानव तस्करी, देह व्यापार, बालकांसाठी असलेल्या विविध योजनांच्या बाबतीतली माहिती साठी एक दिवशीय कार्यशाळा दिनांक 10 सप्टेंबर 2025 पासून ते 13 सप्टेंबर 2025 पर्यंत 15 ही तालुक्यात घेण्यात आल्या सदर कार्यशाळेला पोलीस पाटील अंगणवाडी सेविका शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक तालुक्यातील संबंधित पोलीस अधिकारी प्रामुख्याने प्रशिक्षणासाठी सहभागी झाले होते. सदरची कार्यशाळा दहा ते पाच या वेळेत पंचायत समिती आवारातील सभागृहात घेण्यात आली या कार्यशाळेंच्या आयोजन जिल्हा महिला बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे मॅडम यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी कार्यान्वित केली. सदर कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक साधन व्यक्ती म्हणून हृदय संस्था असेच तू जस्टीस फॉर चिल्ड्रन प्रकल्पाचे क्षेत्रीय अधिकारी श्री शशिकांत मोकाशे, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे जिल्हा समन्वयक मयूर राउत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रतिभा मडावी, चाइल्ड हेल्पलाइनचे जिल्हा समन्वयक अभिषेक मोहुर्ले, प्रामुख्याने प्रति दिवस कार्यशाळेला उपस्थित होते, या संपूर्ण कार्यक्रमावर जिल्हा महिला बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांनी कार्यक्रमाच्या निरीक्षण पथकासोबत व्यक्तिगत स्वतंत्र भेट देऊन कार्यशाळेची पाहणी केली व मार्गदर्शन केले त्याप्रसंगी जिल्हा महिला बालविकास कार्यालयाचे श्री महाकाळकर सर चव्हाण सर श्री मोदेलवार सर एडवोकेट खातखेडे मॅडम यांची उपस्थिती लाभली . या संपूर्ण पंधरा कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांच्या नियंत्रणात तालुका बाल विकास अधिकारी तसे बाल संरक्षण अधिकारी यांच्या सहकार्यातून प्रणाली इंदुरकर, राणी खडसे, प्रिया पिंपळशेंडे, दिपाली मसराम, रुदय संस्थेच्या क्षेत्रीय अधिकारी रश्मी भोयर, सोनम लाडे, व इतर तालुकास्तरावरील सीडीपीओच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी वृंदांच्या मदतीने जिल्ह्यातील 15 तालुक्यातील कार्यशाळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडण्यात आल्या.








