Home चंद्रपूर धानोरा येथे मच्छी तलावात बुडून इसमाचा मृत्यू…

धानोरा येथे मच्छी तलावात बुडून इसमाचा मृत्यू…

0
345

धानोरा येथे मच्छी तलावात बुडून इसमाचा मृत्यू…

विरुर स्टे. / राजुरा, १० सप्टें. :- धानोरा येथे अंदाजे ३५ वर्षीय इसमाचा मच्छी तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सदर इसमाचे नाव गुरुदास लखू टेकाम असून त्याच्या पश्चात दोन मुली व पत्नी असा आप्तपरिवार आहे.

सदर इसम काल संध्याकाळ पासून घरी आला नव्हता. मच्छी तलावावर चपल दिसून आल्याने तलावात शोध घेतला असता सदर इसमाचे शव आढळून आले. काल सायंकाळी घराकडे येत असताना तलावाच्या काठावरून पाय घसरून मृतक तलावात बुडाला अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. तलावातील गाळात पाय फसल्याने बाहेर येता आले नाही, परिणामी पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. घटनास्थळी विरूर पोलीसांनी पंचनामा करून मृतकाचे शव उत्तरीय तपासणी करीता राजुरा येथे नेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!