Home चंद्रपूर राजुरात ईद मिलाद-उन-नबी निमित्त ऐक्याचे दर्शन

राजुरात ईद मिलाद-उन-नबी निमित्त ऐक्याचे दर्शन

0
128

राजुरात ईद मिलाद-उन-नबी निमित्त ऐक्याचे दर्शन

आ. देवराव भोंगळे यांनी इमामांचा केला सत्कार : भाजपाच्या वतीने मिठाई, शीतपेय वाटप

राजुरा : ईद मिलाद-उन-नबीच्या पवित्र पर्वानिमित्त आमदार देवराव भोंगळे यांनी समाजात एकता आणि बंधुता वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला. या खास प्रसंगी त्यांनी स्थानिक मुस्लिम समुदायासोबत मिरवणुकीत भाग घेतला आणि प्रार्थनेत सहभागी होऊन पैगंबर मोहम्मद साहब यांच्या शिकवणींचा गौरव केला. राजुरा येथे ईद मिलाद-उन-नबी निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेहरू चौक या ठिकाणी उभारलेल्या स्वागत मंडपात आमदार देवराव भोंगळे यांनी पाणी, शितपेय, मिठाई वाटप करून मिरवणूक सहभागी इमाम यांना शाल, हार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

आमदार भोंगळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की , “ईद मिलाद-उन-नबी हा प्रेम, शांती आणि एकतेचा संदेश देणारा सण आहे. पैगंबर साहेब यांची शिकवणी आपल्याला सर्वधर्मसमभाव आणि बंधुता शिकवतात. आपण सर्वांनी मिळून समाजात सौहार्द आणि समन्वय वाढवावा.” त्यांनी स्थानिक मस्जिदीला भेट देऊन कुरआनची तिलावत आणि नात-ए-पैगंबरच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. या प्रसंगी सर्वांना ईद मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा देत, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांच्या या सहभागामुळे स्थानिक समुदायात सकारात्मक संदेश गेला असून, हिंदू-मुस्लिम ऐक्याला प्रोत्साहन मिळाले आहे.

या कार्यक्रमात राजुरा जामा मज्जिदके मौलाना साबीर नुरी मौलाना एतशाम अली, मोहम्मद मोईन, हाफीज मौलाना शमशाद हुसैन, दिलदार रजा, मोहम्मद फारूक सिद्दिकी, मतफुल रजा, निजामुद्दीन, मोहम्मद खाजा, सुलेमान चाऊस, हाफिज हाशाम, मौलाना अख्तर रजा, उस्मान सिद्दिकी, जमील कुरैशी, मुनीर शेख, मोहम्मद कासिम, रजिक कुरेशी जमा मस्जिद चे अध्यक्ष रजीत कुरेशी, मुतुजा बेग, जमील खान, तलजीम कुरेशी मतीन कुरैशी, मुजीब बेग, हाजी रफिक शेख, हाजी नसीर उल्ला बेग, हाजी सय्यद सखावात अली, इलियास पटेल, मोहम्मद बशीर, सय्यद बशीर, बाबा बेग, सय्यद ईरफान कबीर बेग, सय्यद शौकत अली, नईम खान, इरशाद बेग, एजाज अहमद, फारुख शेख, जाकीर सय्यद, जाकीर सिद्दिकी, सय्यद शहजाद, इर्शाद बेग, जमील खान, सैईद कुरेशी यांची उपस्थिती होती.

यावेळी आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या हस्ते खोजा सिया समाजातीला हाजींचा सत्कार करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या जुलूस मध्ये शबाना अली अजानी, युसुफ भाई बंदाली, नोसिन हुसेन बंदाली, मुक्तार अली बंदाली, रिजवान बंदाली, डॉक्टर नवाज बंदाली, तौसिक हुसेन बंदाली, राजेश खैरानी सर, अली बंदाली, इरफान अश्फाक बंदाली, सय्यद बदाली, सुहेल मोहम्मद यांचा समावेश होता. यावेळी भाजपाचे सुरेश रागीट, विलास बोनगीरवर, मिलिंद देशकर,सचिन भोयर, सागर भटपल्लीवार, मंगेश श्रीराम, राधेश्याम अडाणीया, प्रदीप मोरे, प्रफुल घोटेकर, गणेश रेकलवार, बापूराव मडावी, आकाश चिंचाळकर, रवी रेकलवार, स्वप्निल पहानपट्टे, सलमान खान, शेख सहजाद अली यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!