Home चंद्रपूर गणपती उत्सव पर्व निमित्त आयोजित बचत गट प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

गणपती उत्सव पर्व निमित्त आयोजित बचत गट प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
198

गणपती उत्सव पर्व निमित्त आयोजित बचत गट प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर, 25 ऑगस्ट 2025 –
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हा परिषद आवारात आयोजित प्रदर्शनास चंद्रपूर वासिय जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

सदर प्रदर्शनी ही 25 ते 28 ऑगस्ट दरम्यान जिल्हा परिषद आवारात असणार आहे. या प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिलांनी हस्तकलेने निर्मित केलेल्या शाडू माती पासून गणपतीच्या मूर्ती, गणपतीचे डेकोरेशन, सजावटीच्या वस्तू यासोबतच घरगुती चविष्ट खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, पारंपारिक अलंकार, कपडे आणि सेंद्रिय उत्पादने यांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील विविध स्वयंसहायता समूह यांनी प्रदर्शनात भाग घेतला असून नागरिकाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की ‘बचत गट महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने येणारा प्रभावी मार्ग आहे’ या प्रदर्शनास चंद्रपूर वासीय जनतेने अवश्य भेट देऊन वस्तूची खरेदी करून ‘एक हात मदतीचा तुमचा हवा’ असे आवाहन केले.

सदर प्रदर्शन 28 ऑगस्ट 2025 पर्यंत सर्वांसाठी खुले असून सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!