Home चंद्रपूर सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ व प्रियदर्शीनी कन्या विद्यालयाचा ग्राम स्वच्छता कार्यक्रम संम्पन्न

सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ व प्रियदर्शीनी कन्या विद्यालयाचा ग्राम स्वच्छता कार्यक्रम संम्पन्न

0
174

सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ व प्रियदर्शीनी कन्या विद्यालयाचा ग्राम स्वच्छता कार्यक्रम संम्पन्न

 

घुग्घुस दि.१४ ऑगष्ट २०२५ गुरूवार रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला व प्रजासत्ताक दिनानिमित्त सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ,जेष्ठ नागरिक संघ, भारतीय बौद्ध महासभा,आदिवासी सेवा मंडळ,घुग्घुस नगरपरिषद तसेच प्रियदर्शीनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घुग्घुस यांचे संयुक्त विद्यमाने १५ ऑगष्ट प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला ग्राम स्वच्छता अभियान प्रियदर्शनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घुस येथील विद्यार्थिनींच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी गांधी चौक,जिल्हा परिषद शाळा परिसर, नगरपरिषद घुग्घुस, मिरची बाजार,संविधान चौक, पोलीस स्टेशन, बस स्थानक घुग्घुस व प्रियदर्शीनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घुस या ठिकाणी या ग्राम स्वच्छता पायदळ रॅली तर्फे स्वच्छता करून सांगता करण्यात आली.
या वेळी या महाविद्यालयाच्या प्राचार्य अनु चोथे,प्राध्यापक सातारडे व प्रा.कवाडे मॅडम, सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी श्री.नांदे श्री.ठेंगणे,श्री.गोबाडे, श्री.पिंपळकर, श्री.मानकर,श्री. घागरगुंडे ,श्री. जुमनाकेआदी मान्यवर उपस्थित होते. श्री.नांदे विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
श्री.ठेंगणे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबा यांनी रचलेल्या गीताच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्वच्छतेचे महत्व विशद केले. आदरणीय सरस्वताबाई पाटील मॅडम यांनी काव्य तथा शायरीच्या माध्यमातून विद्यार्थिनींवर स्वच्छतेच्या बाबतची जागरूकता विद्यार्थी दशेपासून किती आवश्यक आहे हे समजावून सांगितले.
ग्राम स्वच्छता
रॅलीच्या सांगता कार्यक्रमा प्रसंगी प्रियदर्शनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,घुग्घुस येथील प्राचार्य अनु चोथे या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी यावेळी शालेय जीवनामध्ये विद्यार्थी दशेपासून स्वच्छतेचे महत्व विशद केले. प्रमुख उपस्थिती म्हणून पर्यवेक्षक श्री. खामनकर सर, श्रीमती सरस्वताबाई पाटील, समाजसेविका, घुग्घुस तथा सत्य शिव गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी व बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या. राष्ट्रवंदना घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक सातारडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कवाडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!