स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात आम आदमी पार्टी चा एल्गार…
तात्काळ ऑडिट व चौकशीची मागणी
चंद्रपूर : बाबुपेठ परिसरामध्ये अलीकडेच बसविण्यात आलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे अनेक नागरिकांना खुप मोठे वाढीव व अनियमित बिल येत असून जास्तीचे बिलामुळे परिसरात संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात अनेक तक्रारी आम आदमी पार्टीकडे प्राप्त झाल्या आहेत.
आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरण विभागाला निवेदन देऊन बापूपेठमधील सर्व स्मार्ट प्रीपेड मीटरचे तात्काळ ऑडिट व तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. स्मार्ट मीटर लावलेल्या प्रत्येक ग्राहकाला पावसाच्या दिवसाचे 4 हजार 5 हजार बिल आले आहे त्यामुळे गरीब मोलमजुरी करून बिल भरायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच मीटर लावणाऱ्या एजेन्सी कडून ग्राहकाला धमकविण्यात येत आहे. आप ने इशारा दिला कि ऑडिट पूर्ण होईपर्यंत नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तातडीने थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर आम आदमी पार्टीला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.
यावेळेस आपचे राज्य संघटन सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, संघटन मंत्री संतोष बोपचे, सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, बाबुपेठ अध्यक्ष राजू तोंडासे, अनुप तेलतुंबडे, हर्षल नेवलकर, इत्यादी उपस्थित होते.








