Home चंद्रपूर सुरज ठाकरे यांनी मागितली वाढीव मतदारांची यादी

सुरज ठाकरे यांनी मागितली वाढीव मतदारांची यादी

0
749

सुरज ठाकरे यांनी मागितली वाढीव मतदारांची यादी

चंद्रपूर – सविस्तर वृत्त असे की, नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर मत चोरीचे गंभीर आरोप केले. त्यामुळे देशभरात या चर्चेला उधाण आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील २०२४ च्या निवडणुकांमध्ये लोकसभेत आणि विधानसभेत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता त्यात असलेली तफावत ही शंकास्पद असून निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे. जिल्ह्यातील इतर तालुके वगळता फक्त राजुरा विधानसभा क्षेत्रात्रामध्ये झालेले मतदान-
लोकसभे मध्ये ३,१३,६११ आणि विधानसभे मध्ये ३,२५,२७८ या दोन्ही निवडणुकांमध्ये ११,६६७ वाढीव मतदारांचा फरक दिसत आहे. तर अवघ्या सहा महिन्यांमध्ये ११,६६७ हे वाढीव मतदारांच्या संख्येने निर्माण होणारे विविध प्रश्न निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. जसे की ‘सदर वाढीव मतदार बोगस आहेत की कसे?, बोगस असल्यास याची नोंद कोणी केली? अश्या विविध उपस्थित होत असलेल्या प्रश्नांचे समाधान करण्याकरिता जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी आज दिनांक- ११ ऑगस्ट २०२५ ला संबंधित विभागांमध्ये माहिती अधिकारा अंतर्गत माहिती मागविली आहे.
यावेळेस श्री. सुरज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की सदर मागितलेली माहिती प्राप्त होताच त्यात राजुरा विधानसभा क्षेत्रामधील बोगस वाढीव मतदारांचा _मत चोरीचा प्रकार आढळल्यास_ थेट न्यायालय तथा उच्च न्यायालयामध्ये धाव घेईल. व राजुरा मतदार संघातील मतदारांना न्याय मिळवून देईल.
करिता मागितलेल्या माहितीची आतुरता संपूर्ण राजुरा विधानसभा क्षेत्रातील मतदारांना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!