Home चंद्रपूर वर्धा नदीच्या बेलोरा पुलावरून ट्रक कोसळला, अखेर चालकाचा मृत्यु…

वर्धा नदीच्या बेलोरा पुलावरून ट्रक कोसळला, अखेर चालकाचा मृत्यु…

0
429

वर्धा नदीच्या बेलोरा पुलावरून ट्रक कोसळला, अखेर चालकाचा मृत्यु…

घुग्घुस :- दि.१ ऑगस्ट २०२५ शुक्रवार रोज सकाळी ९:२० वाजता वणी जाणाऱ्या मार्गावर असलेल्या वर्धा नदीच्या बेलोरा पुलावरून ट्रक खाली कोसळल्याची भयानक घटना घडली.

माहितीनुसार 18 चक्का हायवा क्रमांक MH34/BZ1402 चड्डा कंपनीचा ट्रक हा वेकोलीच्या नायगाव खदानित कोळसा भरण्यासाठी जात असताना अचानक ट्रक चालकाला हृदयविकाराचा झटका आला व ट्रक अनियंत्रित होऊन पुलाची रेलिंग तोडून वर्धा नदीच्या काठावर पडला. यामुळे ट्रक चालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला. ट्रक चालकाचे नावं यादव असे असून तो शास्त्रीनगर घुग्घूस येथील रहिवाशी असल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्याना होताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली व तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता पोलीस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. गॅस कटरच्या मदतीने ट्रकचे केबिन कापून ट्रक चालकाला बाहेर काढले व जख्मी अवस्थेत राजीव रतन रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!