Home चंद्रपूर घुग्घुस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जनविश्वास सप्ताह

घुग्घुस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जनविश्वास सप्ताह

0
215

घुग्घुस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जनविश्वास सप्ताह

 

घुग्घुस: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २२ ते ३० जुलैपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर तालुकाध्यक्ष श्रीनिवास गोसकुला यांच्यातर्फे जनविश्वास सप्ताहाचे आयोजन गांधीनगर येथे करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनिल काळे यांचा दुर्गा महिला मंडळाच्या अध्यक्षा राजेश्वरी पोगुल्ला, राधा सिरसिल्ला, राजीनीति नगम्मा, श्यामाला तोटा, कमलाताई व महिलांच्या वतीने उपस्थित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुंडलिक खनके, शहर अध्यक्ष रवि डिकोंडा, अक्षय कोवले, योहान ईरगुराला, गोविंद झाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला, भगिनींचे आभार व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!