Home चंद्रपूर अखेर वेकोलिच्या सेवानिवृत्त कामगारांचे धरणे स्थगित

अखेर वेकोलिच्या सेवानिवृत्त कामगारांचे धरणे स्थगित

0
161

अखेर वेकोलिच्या सेवानिवृत्त कामगारांचे धरणे स्थगित

 

घुग्घुस: येथील वेकोलिचे सेवानिवृत्त कामगार व बहुउद्देशीय सिनियर सिटीजन आधार संस्था, घुग्घुसतर्फे २० जुलै रोजी सकाळी १० वाजता राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयापासून ते नगर परिषद कार्यालयापर्यंत विविध प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी धरणे प्रदर्शन करण्यात येणार होते.

नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांच्या सोबत नगर परिषद कार्यालयात रविवार, २० जुलै रोजी सकाळी ९ वाजता वेकोलिच्या सेवानिवृत्त कामगारांची बैठक पार पडली.

बैठकी दरम्यान प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात येणार व प्रलंबित मागण्यांचे तत्काळ निराकरण करण्यात येणार असे आश्वासन मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांनी वेकोलि सेवानिवृत्त कामगारांच्या शिष्टमंडळाला दिले त्या अनुषंगाने २० जुलै रोजी होणारे धरणे प्रदर्शन स्थगित करण्यात आले.

वेकोलि वणी क्षेत्राच्या कॉलरी नं. १ येथील जिल्हा परिषदेच्या मराठी व तेलगू माध्यम प्राथमिक शाळेचे तेथून स्थानांतरण करून नगर परिषद जवळील जिल्हा परिषदेच्या शाळेसोबत जोडणे, घुग्घुसची खुली कोळसा खाण व नकोड्याची खुली कोळसा खाण बंद करण्यात आली आहे परंतु वेकोलि वणी क्षेत्रातर्फे तसे आदेश काढण्यात आले नाही. तरी सुद्धा सुरु असलेल्या कोळसा खाणीच्या परिसरातून मुंगोली कोळसा खाणी पासून ते घुग्घुस रेल्वे सायडींग पर्यंत रेल्वे रूट टाकण्यात येत आहे. अमराई वार्डात भूस्खलन झाले हे रेल्वे रूट धोकादायक आहे.

आठवडी बाजारासाठी वाहनतळाची व्यवस्था करणे, लॉयड्स मेटल्स कंपनी व एसीसी कंपनीची जडवाहतूक शहराबाहेरून करणे, सि. पी. आर. एम.एस. च्या सदस्यांसाठी वेलफेअर बोर्डद्वारे व्यक्तीगत औषधी ठेवण्यासाठी दरवर्षी २ लाख रुपये देण्यात यावे अश्या विविध प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी धरणे प्रदर्शन करण्यात येणार होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नुने, उपाध्यक्ष नरसय्या तांड्रा, सचिव प्रभाकर लिंगमपेल्ली, कोषध्यक्ष रामय्या मासा, सदस्य शंकर बंडी, देवीदास पुनगंटी, दर्शन तालापेल्ली, सूर्यभान आंबट उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!