Home चंद्रपूर लाॅयड्स मेटल्स उद्योगामार्फत राजीव रतन चौकात बुजवले रस्त्यावरील खड्डे

लाॅयड्स मेटल्स उद्योगामार्फत राजीव रतन चौकात बुजवले रस्त्यावरील खड्डे

0
163

लाॅयड्स मेटल्स उद्योगामार्फत राजीव रतन चौकात बुजवले रस्त्यावरील खड्डे

घुग्घुसः लाॅयड्स मेटल्स उद्योगातर्फे वणी रोड राजीव रतन चौकातील रस्त्यावरील खड्डे घुग्घुस पोलिस ठाणे व लॉयड्स मेटल्स कंपनीच्या माध्यमातून गुरुवार रोजी जुलै रोजी बुजविण्यात आले.

सध्या पावसाळा सुरु असल्याने वणी रोड राजीव रतन चौकाच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून पाणी साचून होते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहन धारकांना, पायदळ जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व नागरीकांना नाहकत्रास सहन करावा लागत असे. ही समस्या लक्षात घेत घुग्घुस पोलिस ठाणे व लॉयड्स मेटल्स कंपनीच्या माध्यमातून राजीव रतन चौकातील खड्डे जेसीबी मशीनद्वारे बुजविण्यात आले.

यावेळी घुग्घुस पोलिस निरिक्षक, वाहतूक पोलीस विभाग व लॉयड्स मेटल्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!