Home चंद्रपूर नगर परिषद घुग्घुस तर्फे ‘स्वच्छता अपनाओ बिमारी भगाओ’ अभियान…

नगर परिषद घुग्घुस तर्फे ‘स्वच्छता अपनाओ बिमारी भगाओ’ अभियान…

0
149

नगर परिषद घुग्घुस तर्फे ‘स्वच्छता अपनाओ बिमारी भगाओ’ अभियान…

 

घुग्घुस च्या हद्दींतर्गत स्वच्छ भारत अभियान तथा स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 01 जुलै ते 31 जुलै पर्यंत “सफाई अपनाओ बिमारी भगाओ” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्वच्छतेचे 6 मंत्र देण्यात आलेले आहेत.
1) स्वच्छ हात : आपले दैनदिन काम झाल्यावर वेळोवेळी आपले हात स्वच्छ साबणाने किंवा नी स्वच्छ धुवून घ्यावे. जेणेकरून आपल्याला कोणत्याही आजाराची लागण होणार नाही. 2) स्वच्छ घरे : आपले घर स्वच्छ झाडून, जंतुनाशकाने आपले घर स्वच्छ पुसून काढावे घराच्या आजूबाजूला पाण्याचे डबके साचू देवू नये, परिसराला स्वच्छ ठेवावे. कचऱ्याचे ढीग जमा करू नये कचरा वेगवेगळा (ओला, सुका) नगर परिषद कचरा संकलन वाहनात टाकून द्यावे. 3) स्वच्छ शौचालये: आपले घरातील तसेच सार्वजनिक शौचालयाचे वापर केल्यावर मुबलक प्रमाणात पाणी टाकावे व स्वच्छ ठेवावे.
4) स्वच्छ परिसर : आपल्या घराच्या आजू बाजूचा परिसर स्वच्छ करून घ्यावे कचरा जमा करू नये. 5)स्वच्छ नाले आणि जलसाठे : आपल्या घरासमोरील तथा सार्वजनिक नालीमध्ये कचरा टाकू नये, शौच व इतर तत्सम घाण टाकू नये अन्यथा त्याचे वाईट परिणाम आपल्यास भोगावे लागतात. 6) स्वच्छ सार्वजनिक जागा : सार्वजनिक परिसराची स्वच्छता राखण्यास नगर परिषदेची मदत करावी. कचरा कचरापेटीतच टाकावे. मेलेली जनावरे, उरलेले अन्न, भाजीपाला इत्यादी कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये. सदर कचऱ्याने आजूबाजूला रोगराई पसरू शकते करिता आपले आरोग्य जपण्यास सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!