Home चंद्रपूर घुग्घुस शहरात मच्छर, किटकाचे प्रमाण वाढल्यामुळे नगरपरिषदेने फवारणी करण्याची संत श्री. साईबाबा...

घुग्घुस शहरात मच्छर, किटकाचे प्रमाण वाढल्यामुळे नगरपरिषदेने फवारणी करण्याची संत श्री. साईबाबा बहुउद्देशीय संस्थेची मागणी

0
155

घुग्घुस शहरात मच्छर, किटकाचे प्रमाण वाढल्यामुळे नगरपरिषदेने फवारणी करण्याची संत श्री. साईबाबा बहुउद्देशीय संस्थेची मागणी

आता सात जून 2025 पासून पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे परिसरात नाल्या डबके खड्डे हे पाण्याने तुरुंग भरले आहे व या परिसरात ठीक ठिकाणी कचरा व घाण जमा झाली आहे त्यामुळे ठीक ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे नागरिक सुद्धा त्रस्त झाले आहे या कचऱ्यामुळे व पाण्यामुळे येथील नागरिकाला डेंगू चे व कीटकाचे प्रमाण वाढत आहे त्याकरिता आज दिनांक दोन सात 2025 रोज बुधवार ला संत श्री साईबाबा बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने व नागरिकांच्या वतीने नगरपरिषद मूखयाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष गणेश जी शेंडे उपाध्यक्ष गणेश जी वझे सचिव पंकज जी बावणे कोशाध्यक्ष शंकर जी कामतवार सचिन बोंडे या सर्वांनी प्रशासनाला निवेदन दिले व सूचना केली की आपण पावसाळा सुरू असल्यामुळे या परिसरात भविष्यात कोणतीही मोठी बिमारी किंवा आजार होऊ शकतो त्यासाठी डेंगू मलेरिया कीटकांचे प्रमाण वाढल्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा त्रास होत आहे त्यामुळे आपण या परिसरात जंतू नाशक पावडर नाल्यांमध्ये व डबक्यात टाकावेत व ठिक ठिकाणी जंतू नाशक फवारणी यंत्राद्वारे फवारणी करण्यात यावी जेणेकरून पावसाच्या कुठल्याही बिमारीला येतील नागरिकांना सामोरे जावे लागणार नाही व परिसर सुद्धा स्वच्छ करण्यात यावा अशी येथील समस्त नागरिकांतर्फे व संत श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्था तर्फे नगरपरिषद प्रशासनाला पत्र देऊन विनंती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!