पळसगाव येथे वीज कडाडली अन् झोपडी जळाली…
तालुका प्रतिनिधी
चिमूर
तालुक्यातील पळसगाव परिसरात गुरुवरला दुपारी 2.00वाजता दरम्यान मेघ गर्जनेसह पाऊस झाला.या मध्ये वीज कडाडून पळसगाव येथील झोपडी जळाली , सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
सविस्तर वृत्त असे की पळसगावं परिसरात जोरदार मेघ गर्जनेसह पाऊस झाला.या दरम्यान वीज कडाडून करनदास गोमाजी मेश्राम यांच्या झोपडीवर वीज पडली.ही झोपडी पूर्णतः जळाली असून त्या झोपडीतील मासेमारी करण्याचे साहित्य, विजेवर आधारित उपकरण,सायकल,ध्यान साठविले ड्रम ,अनेक जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
सुदैवाने वीज कडाडण्याच्या दोन मिनिटे पूर्वी झोपडीतून दोघेजण बाहेर पडून शेजारच्या घरात गेल्याने मोठा अनर्थ टळला.








