Home चंद्रपूर स्ट्रेंथ टेस्टने फोडला रस्त्याचा बुरखा ; AAP च्या संघर्षानंतर महापालिकेने ठेकेदाराला दिले...

स्ट्रेंथ टेस्टने फोडला रस्त्याचा बुरखा ; AAP च्या संघर्षानंतर महापालिकेने ठेकेदाराला दिले पुनर्बांधणीचे आदेश

0
130

स्ट्रेंथ टेस्टने फोडला रस्त्याचा बुरखा ; AAP च्या संघर्षानंतर महापालिकेने ठेकेदाराला दिले पुनर्बांधणीचे आदेश

 

चंद्रपूर – वडगाव प्रभागात महापालिकेच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेले सिमेंट रस्ते अवघ्या काही महिन्यांतच उखडले गेले. ठिकठिकाणी खड्डे, उध्वस्त झालेला रस्ता आणि नागरिकांचा रोष – हे चित्र सामान्य झाले होते. परंतु, या निकृष्ट कामामागे दडलेली ठेकेदार-प्रशासन-राजकीय युती आम आदमी पक्षाच्या लढ्यामुळे उघडकीस आली आहे.

M-20 चा दावा फोल ; प्रत्यक्षात M-13 निघाली स्ट्रेंथ

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वात वडगाव प्रभागातील या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ठेकेदाराने M-20 दर्जाचा रस्ता बांधल्याचा दावा केला होता. मात्र, स्वतंत्र स्ट्रेंथ टेस्टमध्ये हा दावा फोल ठरला व प्रत्यक्षात फक्त M-13 दर्जा असल्याचे स्पष्ट झाले.

ही बाब फेसबुक लाईव्हद्वारे जनतेसमोर आणताच, सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या. नागरिकांचा रोष वाढू लागला आणि प्रशासनावर दबाव निर्माण झाला.

महापालिका झुकली ; ठेकेदाराला पुनर्बांधणीचे आदेश

या संतापाच्या पार्श्वभूमीवर आणि आम आदमी पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर, महापालिकेने अखेर संबंधित ठेकेदाराला रस्ता पुन्हा बांधण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. सध्या त्या ठिकाणी पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले असून, प्रशासनाने एकप्रकारे आपली चूक मान्य केली आहे.

नगरसेवक नसतानाही लोकशक्तीच्या जोरावर लढा

ही बाब विशेषतः लक्षवेधी ठरते की, चंद्रपूर महापालिकेत आम आदमी पक्षाचा एकही नगरसेवक नसतानाही, या पक्षाने केवळ तांत्रिक अभ्यास, प्रत्यक्ष पाहणी, जनतेचा विश्वास आणि सोशल मीडियाच्या प्रभावी वापरातून संपूर्ण प्रशासनाला झुकवले. ही लढाई आंदोलनाची नाही, तर पुराव्यांची होती.

कार्यकर्त्यांची ठाम भूमिका

या लढ्यात जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्यासोबत
राजू कुडे युवा जिल्हाध्यक्ष ,योगेश गोखरे (शहराध्यक्ष) राजकुमार नगराडे (जिल्हा सचिव) संतोष बोपचे (शहर संघटन मंत्री) विशाल विरंमवार, प्रदीप वाळके, संजय करलूके,इंद्रपाल यादव,विजेंदर सिंह गिल,क्रिश कपूर,आदित्य नंदनवार यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत शिस्तबद्ध, माहितीपूर्ण आणि जनतेच्या हितासाठीचा लढा दिला.

“जनतेचा पैसा वाया जाता कामा नये” – AAP

आम आदमी पक्षाने नागरिकांना आवाहन केले की, “जनतेच्या पैशातून उभारण्यात येणाऱ्या कामावर जनता देखरेख ठेवावी. कुठेही भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जा किंवा हलगर्जीपणा आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी.”

“ही लढाई एका रस्त्यापुरती नव्हती, तर जनतेच्या हक्कासाठी होती,” असे म्हणत पक्षाने ही मोहीम यशस्वी ठरवली आहे.

 

निकृष्ट काम उघड – सत्तेची नजरेत नजर घालणारा लढा

वडगाव प्रभागातील रस्त्याची पुनर्बांधणी ही केवळ डागडुजी नव्हे, तर निष्क्रिय आणि भ्रष्ट व्यवस्थेवर लोकशक्तीचा विजय आहे. हा लढा दाखवून देतो की राजकीय पद नसतानाही, अभ्यास, सचोटी आणि लोकांचा विश्वास असल्यास कोणतीही यंत्रणा झुकवता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!