Home चंद्रपूर बामणवाडा ग्रामपंचायतीतील स्नेहदीप कॉलनीसह सहा कॉलनींमध्ये पुरसदृश स्थिती : नागरिक त्रस्त, प्रशासन...

बामणवाडा ग्रामपंचायतीतील स्नेहदीप कॉलनीसह सहा कॉलनींमध्ये पुरसदृश स्थिती : नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प!

0
176

बामणवाडा ग्रामपंचायतीतील स्नेहदीप कॉलनीसह सहा कॉलनींमध्ये पुरसदृश स्थिती : नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प!

 

राजुरा (प्रतिनिधी) : राजुरा तालुक्यातील नामवंत आणि गर्भश्रीमंत मानली जाणारी बामणवाडा ग्रामपंचायत आता नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. स्नेहदीप कॉलनी, चारपत्ता गोडाऊन, स्टेला मेरिस कॉन्व्हेंट, तक्षशिला नगर, नालंदा नगर आणि बिरसा मुंडा कॉलनी या भागात केवळ अर्ध्या ते एक तासाच्या पावसामुळे पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेले काम, आणि जंगलातील वाहत नाल्याचे अयोग्य नियोजन यामुळे हा आपत्तीजन्य प्रसंग उद्भवला आहे.

लोकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले असून घरांमध्ये, रस्त्यांवर, परिसरात फक्त पाणीच पाणी झाले आहे. स्नेहदीप कॉलनीतील नागरिक तर रोजच्या पावसात अक्षरश: जलतरण तलावात जगत आहेत, असे दृश्य दिसत आहे. महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या ग्रील कंपनीने योग्य जलनियोजन न केल्यामुळे नाल्याचे पाणी थेट रहिवासी भागात घुसत आहे.

बामणवाडा येथील स्नेहदीप कॉलनी तसेच समोरील चारपत्ता गोडाऊन, स्टेलामारी कॉन्व्हेंट त्यानंतर तक्षशिला नगर, नालंदा नगरी त्यानंतर येणारा बिरसा मुंडा कॉलनी या सर्व कॉलनीमध्ये या एका राष्ट्रीय महामार्ग निर्मितीमुळे तसेच जंगलातील पूर्ण वाहत येणाऱ्या नाल्यातील पाण्यामुळे आज अवघ्या एका तासाच्या पावसामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

बामणवाडा ही ग्रामपंचायत ले-आऊट मंजूरीमध्ये अतिशय सक्रिय असून येथे कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होत असतो. मात्र, या पैशातून नागरिकांसाठी मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयश आले आहे. आदिवासी व गरीब समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत व्यावसायिकांनी कोट्यवधींची उलाढाल केली. मात्र पावसाळा आला की त्याच नागरिकांना रोगराई, चिखल, दुर्गंधी व अपायकारक पाण्याचा सामना करावा लागतो.

नागरिकांची मागणी : ले-आऊट धारक आणि ग्रिल कंपनीवर कठोर कारवाई करा!

या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच संबंधित यंत्रणेकडे विनंती केली आहे की, या ले-आऊट धारकांवर आणि महामार्ग निर्माण करणाऱ्या कंपनीवर तात्काळ व कठोर कारवाई करावी. तसेच, स्थायी जलनियोजन, नाल्याचे योग्य मार्गदर्शन, आणि पुरवठा यंत्रणेची पुनर्रचना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर संपूर्ण परिसरात मोठा रोगराईचा उद्रेक, मालमत्तेची हानी, व सामाजिक असंतोष वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!