Home चंद्रपूर अन् विदयार्थीनींच्या चेहऱ्यावर हसू उमटले ; अदानी फाऊंडेशनचा उपक्रम

अन् विदयार्थीनींच्या चेहऱ्यावर हसू उमटले ; अदानी फाऊंडेशनचा उपक्रम

0
251

अन् विदयार्थीनींच्या चेहऱ्यावर हसू उमटले ; अदानी फाऊंडेशनचा उपक्रम

घुग्घूस :- ६ ऑगष्ट २०२५ श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली अंतर्गत प्रियदर्शिनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घूस ता. जि. चंद्रपूर येथे शिक्षण घेणाऱ्या विदयार्थीनींना बसण्याकरिता उच्च प्रतिच्या धातूपासून तयार केलेले डेक्स-बेंच दिल्यामुळे विदयार्थीनींच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

सामाजिक कार्याकरिता सदैव पुढाकार घेणाऱ्या अदानी फाऊंडेशन चांदा सिमेंट वर्क्स च्या वतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी अनू चोथे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अदानी फाऊंडेशनचे चिफ प्लॅन्ट हेड सत्यनारायण दिगामर्थी, सी.एस.आर. हेड अक्षय पतंगे, फाल्गुन खामणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विदयार्थीनींना बसण्याकरीता डेक्स-बेंच भेट दिलेत.

यावेळी मार्गदर्शन करतांना सत्यनारायण दिगामर्थी म्हणाले की, शालेय जीवनापासूनच विदयार्थीनींनी स्पर्धा परिक्षेची तयारी करावी. तसेच विदयार्थी दशेतचं वेगवेगळया उपक्रमात भाग घेवून आपले व्यक्तीमत्व तेजस्वी व तपस्वी बनन्यावर भर दिला पाहीजे. यावेळी अक्षय पतंगे यांनी सुध्दा विदयार्थीनींना मार्गदर्शन करून कारखाण्याकडून होईल तेवढी शाळेला मदत करण्याचे आश्वासन दिले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्या अनू चोथे यांनी अदानी फाऊंडेशनचे आभार मानून प्रत्येक वर्षी असे उपक्रम राबवावे अशी विनंती केली. कार्यक्रमाचे संचालन बलवंत विखार यांनी तर कु. समीक्षा कांबळे हीने उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!