Home चंद्रपूर चंद्रपूरमधील इनरव्हील क्लबने महिला कैद्यांना दिलं राखी बनवण्याचं प्रशिक्षण

चंद्रपूरमधील इनरव्हील क्लबने महिला कैद्यांना दिलं राखी बनवण्याचं प्रशिक्षण

0
141

चंद्रपूरमधील इनरव्हील क्लबने महिला कैद्यांना दिलं राखी बनवण्याचं प्रशिक्षण

चंद्रपूर :- रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर, इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरने चंद्रपूरच्या केंद्रीय कारागृहात असलेल्या सुमारे 50 महिला कैद्यांसाठी राखी बनवण्याचं प्रशिक्षण आयोजित केलं. ‘प्यार की रेशम डोरी’ नावाचा हा तीन दिवसांचा उपक्रम 2 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट 2025 या काळात पार पडला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन 2 ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त (जेल) श्री अनुप कुमार कुमारे यांच्या हस्ते झालं. क्लबने महिला कैद्यांना राखी बनवण्यासाठी लागणारी सर्व सामग्री दिली. क्लबच्या सुमारे 15 सदस्यांनी तीनही दिवस उपस्थित राहून प्रशिक्षणात सहकार्य केलं.
या उपक्रमात महिला कैद्यांनी सुमारे 300 सुंदर राख्या बनवल्या आहेत. या राख्या जेलच्या बाहेर विक्रीसाठी ठेवल्या जातील आणि त्यातून मिळालेली रक्कम कैद्यांच्या कल्याण निधीत जमा केली जाईल. क्लबच्या या उपक्रमाने कैद्यांना एक नवा आत्मविश्वास आणि कौशल्य मिळालं आहे, ज्यामुळे त्या भविष्यात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतील.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी, 4 ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त श्री कुमारे पुन्हा उपस्थित होते. त्यांनी क्लबच्या या माणुसकीच्या उपक्रमाचं कौतुक केलं. ते म्हणाले, “हा एक प्रेरणादायी उपक्रम आहे, ज्यामुळे महिला केवळ आत्मनिर्भर बनणार नाहीत, तर त्यांच्या पुनर्वसनाच्या दिशेनेही सकारात्मक बदल घडेल.
इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या या सामाजिक कार्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचं कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला क्लबच्या अध्यक्षा अर्चना उचके सचिव हिमानी गोयल कीर्ती चांदे सुचिता जेऊरकर, अंजली उत्तरवार, रंजना पडवेकर, राधिका गंग्रेड्डीवार, प्रिया खेतान, कोमल वैद्य किरण आवळे आणि इतर सदस्य उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!