Home चंद्रपूर घुग्घुस शहरात कामगार कर्मचाऱ्यांच्या अपघात होताच प्रशासनाला आली जाग, ट्राफिक सिंग्नल सुरू…

घुग्घुस शहरात कामगार कर्मचाऱ्यांच्या अपघात होताच प्रशासनाला आली जाग, ट्राफिक सिंग्नल सुरू…

0
210

घुग्घुस शहरात कामगार कर्मचाऱ्यांच्या अपघात होताच प्रशासनाला आली जाग, ट्राफिक सिंग्नल सुरू…

 

 

पंकज रामटेके

✍🏻पंकज रामटेके
घुग्घुस येथील नवनिर्माण बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात कित्येक महिन्यापासून ट्राफिक सिंग्नल बंद होते. कामगार कर्मचाऱ्यांच्या मृत्यू नंतर कुंभकर्णी झोपेत गेलेले प्रशासन जागे झाले, आणि ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात आल्याने प्रशासन सामान्य माणसाच्या जीवावर उठले आहे का..? अशी चर्चा नागरिक करत आहेत.

सदर ठिकाणी सुरू असलेले पुलाचे काम कासव चालीप्रमाणे संथ गतीने सुरू होते. आणि रेल्वे गेट वारंवार बंद राहत असल्याने ये – जा करणाऱ्या सामान्य स्थानिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र शासन, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी कर्तव्याला बगल देऊन कुंभकर्णी झोप घेत होते. राजकारणी नेते थातूरमातूर निवेदन देऊन स्वतःला मिरवत फिरत होते. मात्र सदर ठिकाणा वरील गंभीर जीवघेण्या समस्येकडे कोणीही जाणिवेने लक्ष दिले नाही, अखेर दोन निष्पाप कामगार कर्मचाऱ्यांचा गंभीर अपघात झाल्या नंतर प्रशासनाला जाग आली आणि सिग्नल सुरू करण्यात आल्याचे नागरिकांत बोलल्या जात आहे.

राजकारणी नेत्यांकडून स्वतःला मिरवत छोटे कार्यक्रम आयोजित केले. पण ट्राफिक सिंग्नल बंद का! त्याच्याकडे कधी लक्ष दिले गेले नाही. फक्त राजकारण करीत राहणार येवढेच शहरात अनेक वर्षांपासून चालु आहे.

काही दिवसा पूर्वी ३० जुलै बुधवार रोजी रात्री ९:२० वाजता बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या परिसरात दोन कामगार कर्मचाऱ्यांच्या अपघात होताच वाहतूक सिग्नल सुरू झाले. अपघात झाल्यावरच का शासन, प्रशासनला जाग आली! शहरात मंत्री आल्यावरच रस्त्यावरचे गड्डे थातूरमातूर का बुजवतात..? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात ‘आ’ वासून उभ्या आहेत

समोर आता शहरातील पहिल्यांदाच नगरपरिषद निवडणूक येत असल्याने छोटे, मोठे, जेष्ठ, सामाजिक नेते जागे झाले आणि थातूरमातूर आंदोलन, निवेदन करीत आहेत अशीही नागरिकांत चांगलीच चर्चा रंगली. समोर येत असलेल्या आगामी नगरपरिषद निवडणूकीत आजी, माजी नेत्यांना चांगलाच निवडणूकीचा फटका बसेल असे चित्र दिसत आहेत.

नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत की, किती दिवस ट्राफिक सिग्नल सुरू राहणार व आणि राजकीय नेते, शासन, प्रशासन जडवाहतूकीला मात देणार आणि अपघात होणार नाही याची गंभीरतेने दखल घेतली जाणार असेही नागरिकांकडून बोलण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!