‘घोट तालुका निर्मिती करावा’ भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना स्थानिक नागरिकांचे निवेदन…
✍️सुखसागर झाडे
चामोर्शी : घोट परिसरामध्ये अंदाजे १७ ग्रामपंचायती आहेत आणि जवळपास एक लाखाहून अधिक जनसंख्या आहे. घोट तालुक्याची निर्मिती व्हावी या करिता घोट परिसरातील समस्त जनतेनी वेळोवेळी आंदोलने केलेली आहेत. वारंवार शासनास निवेदन सादर केले आहे. परंतु अद्यापही घोट तालुक्याची निर्मिती करण्यात आलेली नाही. सदर संबंधी घोट तालुका निर्मिती करिता आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या आमदार कार्यकाळात शासनास पाठपुरावा केला होता.
घोट परिसरातील जनतेस छोटे मोटे काम करावयाचे असल्यास चामोर्शी ला जावे लागते. तसेच चामोर्शीला जावूनसुद्धा वेळेवर कामे होत नाही. काम न करताच जनतेला परत यावे लागत असल्याने लोकांचा हिरमोड होतो. त्या दृष्टीने घोट तालुका निर्माण होणे गरजेचे आहे. घोट परिसरातील जनतेला प्रत्येक वेळी महसुली कामाकरिता चामोर्शीला जावे लागते आणि तहसील कार्यालयात एका दिवसात काम होणे शक्य नाही. घोट येथे महसूल विभागाच्या सचिवालयाची इमारत सुद्धा उपलब्ध आहे.
घोट परिसरातील गोरगरीब जनतेची होणारी हेळसांड थोड्या प्रमाणात कमी करण्यासाठी घोट येथे “तहसील” म्हणजे तहसीलदार यांची नेमणूक झाल्यास जनतेची होणारी हेळसांड कमी करता येईल. शासनाने याकडे जातीने लक्ष घालावे अशी जनतेची जनतेकडून विनंती केली आहे.
करिता घोट परिसरातील लोकांच्या दररोज उद्भवणाऱ्या प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून घोट तालुका निर्मिती करिता शासनाकडे नियमित पाठपुरावा करून तालुक्याची निर्मिती करण्यासाठी आमदार कार्यकाळात शासनाकडे पाठपुरावा केला होता. यापुढेही पाठपुरावा सुरूच ठेवणार असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी निवेदन धारकांना आश्वासन दिले.
निवेदन धारक अशोकभाऊ पोरेडीवार, आसिफ सय्यद, अविनाश वडेट्टीवार, विलास उइके,अतुल येनगंटीवॉर, साईनाथ बुरांडे, रुम्पा शाहा, मंगला कुलसंगे, बाबूराव भोवरे, सचिन साखरकर उपस्थित होते.









