लकडकोट RTO चेक पोस्टवरील भ्रष्टाचारावर आम आदमी पक्षाची ठाम भूमिका – RTO प्रमुखांनां दिले लेखी निवेदन
RTO कडून 4 दिवसात लेखी उत्तर देण्याचे आश्वासन
चंद्रपूर, २१ जुलै
दिनांक १६ जुलै २०२५ रोजी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि पक्षाच्या पदाधिकारीयांनी लकडकोट (महाराष्ट्र-तेलंगणा सीमा) येथील RTO चेक पोस्टवर झालेल्या अपारदर्शक आणि बेकायदेशीर वर्तनाविरोधात प्रमुख RTO अधिकारी श्री. किरण मोरे यांची भेट घेतली व त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनात खालील गंभीर मुद्दे मांडण्यात आले…
प्रमुख तक्रारी व चौकशीसाठी उपस्थित केलेले प्रश्न
1. विना-वर्दी ड्युटी
→ अधिकारी योगिता राणे व कांबळे हे सिव्हिल ड्रेसमध्ये ड्युटीवर होते.
→ Rule 286 व 287 नुसार वर्दी अनिवार्य आहे, मग विना-वर्दीत कसे?
2. ऐका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचे अडीच तास वाहन अडवण्यामागील कायदेशीर कारण
→ MH-34 BR-1878 हे वाहन कोणत्या कायद्यानुसार अडवले गेले?
→ त्या दिवशी संबंधित अधिकाऱ्यांची ड्युटी ऑर्डर, रजिस्टरवर नोंद होती का?
3. RTO चेक पोस्टवरील माहिती मागणी
→ कर्मचारी किती आहेत त्यांची नावासहित यादी
दिवसभरात किती महसूल गोळा होतो व महिन्याभरात किती
रोज किती वाहणाची ये जा होते
याची माहिती
→ रोखीच्या स्वरूपात पैसे घेण्याचा अधिकार आहे का? ऑनलाईन बंधनकारक आहे का?
→ CCTV कॅमेरे – संख्या, लोकेशन, रेकॉर्ड स्टोरेज
→ वॉकी-टॉकी वापरणारे कोण? त्यांच्या परवानग्यांचा तपशील
4. ट्रक चालकांना पाठवले जाणारे काउंटर
→ कोणत्या खिडकीवर व कोणत्या पदावरील व्यक्ती कार्यरत आहेत?
5. सरकारी ठिकाणी व्हिडिओ शूटिंगला बंदी आहे का?
→ हा परिसर प्रतिबंधित (Restricted) आहे का?
→ व्हिडिओ घेतल्यास कोणत्या कायद्यानुसार गुन्हा होतो?
RTO प्रमुख श्री. किरण मोरे यांचे उत्तर
ड्रेस कोड प्रकरणात – संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांचे लेखी उत्तर मागवले जाईल. त्याचा अहवाल पक्षाला पुरवण्यात येईल.
व्हिडिओ शूटिंग बाबत स्पष्ट उत्तर
“सरकारी कार्यालय वा चेक पोस्ट परिसरात व्हिडिओ घेण्यास कोणतीही कायदेशीर मनाई नाही.”
त्यामुळे, अधिकारी “व्हिडिओ घेणे गुन्हा आहे” असे सांगणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे.
आम आदमी पक्षाचे नागरिकांना स्पष्ट आवाहन
“लकडकोट RTO चेक पोस्टवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. ट्रक चालकांकडून त्यांच्या वाहनाच्या चाकांनुसार ‘एन्ट्री’ च्या नावाने पैसे घेतले जातात.”
त्यामुळे ट्रक चालक, नागरिक, ट्रान्सपोर्टर, पत्रकार यांनी मोबाईल व्हिडिओ चालू ठेवावा. जेव्हा पैसे मागितले जातात, ते रेकॉर्ड करावे व ते सोशल मीडियावर किंवा आम आदमी पार्टी कडे शेअर करून भ्रष्टाचार उघड करावा.
आता भ्रष्टाचाराविरुद्ध लढा फक्त नेत्यांनी नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने उभा राहून द्यावा.
या भेटीत उपस्थित पदाधिकारी
सुनील मुसळे – प्रदेश जॉईंट सेक्रेटरी
मयूर राईकवार – जिल्हाध्यक्ष
योगेश गोखरे – शहराध्यक्ष
संतोष बोपचे – शहर संघटनमंत्री
दीपक बेरशेट्टीवार – जिल्हाध्यक्ष, शेतकरी आघाडी
एड. तबस्सुम शेख – अध्यक्ष, महिला आघाडी (शहर)
राजकुमार नगराळे – जिल्हा कोषाध्यक्ष
सतीश रासावर – सहकोषाध्यक्ष
एकनाथ हांडेकर – अध्यक्ष, शिक्षक आघाडी व इतर कार्यकर्ते
आम आदमी पक्षाची ठाम भूमिका
RTO च्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा आता जनतेच्या पुढाकारातून दिला जाणार आहे.
चेक पोस्टवरील बेकायदेशीर वसुली बंद झाली पाहिजे.
दोषींवर तात्काळ शिस्तभंगात्मक कारवाई झाली पाहिजे.
“सत्ता कोणाच्याही हाती असली, तरी अन्याय करणाऱ्यांवर आम्ही आवाज उठवत राहू. आता प्रत्येक ट्रक ड्रायव्हरच ‘कॅमेरा’च्या माध्यमातून यंत्रणेला आरसा दाखवेल!” – मयूर राईकवार








