इंदिरा गांधी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय विरुर स्टेशन तर्फे आयआयटी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार
विरुर स्टे. (राजुरा), ३० जून
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ विरूर स्टेशन द्वारा संचालित इंदिरा गांधी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय विरुर स्टेशन तर्फे आयआयटी उत्तीर्ण 2025 उत्तीर्ण अंतरिक्ष बंडू रामटेके याने कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता स्वतः जिद्दीने कठोर परिश्रम करून आत्मविश्वासाने आयआयटी 2025 ची परीक्षा उत्तीर्ण करून कुटुंबाचा, महाविद्यालयाचा, गावाचा, तसेच परिसराचा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नावलौकिक केलेले आहे.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकरराव ढवस तसेच संस्थेचे संस्थापक,सचिव श्री रमेश पायपरे सर, तसेच मुख्याध्यापक, श्री राजू साखरकर आणि प्राचार्या कुंभारे मॅडम यांनी अंतरिक्ष व त्यांच्या आई-वडिलांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. याप्रसंगी अंतरिक्षनी सर्व विद्यार्थ्यांना मी आयआयटी उत्तीर्ण करण्याकरिता आत्मविश्वासाने अभ्यास करून सदर परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. मनावर घेतले असता प्रत्येक कार्य आपण यशस्वी करू शकतो त्याकरता मला माझी आई वडिलांकडून आणि प्राचार्य प्राध्यापकांकडून मोलाची मार्गदर्शन मला प्राप्त झाल्यामुळे मी माझ्या जीवनामधील काठीन्य समजल्या जाणारी परीक्षा सहज आणि सोप्या रीतीने उत्तीर्ण केलेली आहे. अगदी असेच कार्य आपण सर्व विद्यार्थ्यांनी करावे अशी माझी अपेक्षा आहे. असे मत अंतरिक्ष यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले.
तसेच संस्थेचे सचिव श्री रमेश पायपरे सर यांनी सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक ना एक कला निपुण असतो. ती कला प्रकट करण्याकरिता जीवनामध्ये अशा आयआयटी, आय ए एस, आयपीएस, आय एफ एस, अशा उच्च दर्जाच्या परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी वाचन, लेखन ,मनन आणि चिंतन जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी केलेत तर जीवनामध्ये कोणतेही यश संपादन करण्याकरिता काहीही अवघड नाही. असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच प्रभाकर ढवस, राजू साखरकर, कुंभारी मॅडम यांनी सुद्धा मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ विरूर स्टेशन या संस्थेचे अध्यक्ष, श्री प्रभाकरराव ढवस, संस्थेचे संस्थापक- सचिव श्री. रमेश पायपरे सर, मुख्याध्यापक, राजू साखरकर सर,प्राचार्या कुंभारे मॅडम, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अविनाश रामटेके, प्रभाकर रामटेके ,बंडू रामटेके, शाहू नारनवरे ,प्राध्यापक रवी कुमार देवेकर, कौरासे सर, गौरकार सर, मनिषा ढवस मॅडम, वनिता पेरगुलवार मॅडम, गजानन ढवस,यशवंत नक्कावार, अरुणा रामटेके तसेच वर्ग बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी अंतरिक्ष ला पुढील शिक्षणाकरिता शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी करण्यात आली.








