Home चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुखपदी समीर लेनगुळे

युवासेना जिल्हाप्रमुखपदी समीर लेनगुळे

0
51

युवासेना जिल्हाप्रमुखपदी समीर लेनगुळे

वणी-आर्णी विधानसभेत युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वणी-आर्णी विधानसभा क्षेत्रासाठी युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी समीर लेनगुळे यांची निवड करण्यात आल्याने संपूर्ण विधानसभा क्षेत्रात युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही निवड युवा संघटनेला नवी ऊर्जा देणारी मानली जात आहे.

समीर लेनगुळे हे युवकांमध्ये सक्रिय, संघर्षशील आणि पक्षनिष्ठ चेहरा म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षांत पक्षासाठी सातत्याने काम करत असताना त्यांनी युवकांशी मजबूत संपर्क निर्माण केला आहे.

त्यामुळेच त्यांच्या नियुक्तीकडे केवळ पदवाटप म्हणून नव्हे, तर भविष्यात मोठी संघटनात्मक ताकद उभी करण्याचा निर्णय म्हणून पाहिले जात आहे.

कार्यकर्त्यांमध्ये “योग्य व्यक्तीची योग्य पदावर निवड” अशी भावना व्यक्त होत असून, वणी-आर्णी विधानसभा क्षेत्रात युवा सेनेची नव्या दमाने उभारणी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. गावपातळीपर्यंत युवकांना जोडून पक्षाची मजबूत फळी उभी करण्याची क्षमता समीर लेनगुळे यांच्यात असल्याचे मत अनेक शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

“युवकांचा दम, संघटनेची ताकद आणि पक्षनिष्ठेचा विश्वास — समीर लेनगुळे यांच्या नियुक्तीमुळे वणी-आर्णी विधानसभेत युवा सेनेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे,” अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून उमटत आहेत.

येणारा काळ हा युवा सेनेच्या युवकांचा असेल, असे स्पष्ट संकेत या नियुक्तीतून दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!