Home चंद्रपूर घुग्घुस येथे लॉयड्स कौशल्य विकास केंद्राचे भव्य उद्घाटन

घुग्घुस येथे लॉयड्स कौशल्य विकास केंद्राचे भव्य उद्घाटन

0
135

घुग्घुस येथे लॉयड्स कौशल्य विकास केंद्राचे भव्य उद्घाटन

घुग्घुस :- घुग्घुस आणि परिसरातील युवकांना रोजगारक्षम बनवून त्यांना उद्योग क्षेत्रासाठी तयार करण्याच्या उद्देशाने “लॉयड्स कौशल्य विकास केंद्र” चे भव्य उद्घाटन सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. हे केंद्र लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले आहे.

या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा.श्री.मधुर गुप्ता उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास मान्यवर म्हणून युनिट हेड मा.श्री. वा.जी.एस. प्रसाद,मा.श्री.प्रशांत पुरी,मा.श्री पवन मेश्राम यांची विशेष उपस्थिती लाभली.

घुग्घुस तसेच परिसरातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना भविष्यातील औद्योगिक संधींसाठी सक्षम बनवणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक उद्योगांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या केंद्रात विशाल कॅम्पस, सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक वर्गखोल्या तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण करिअर विकासासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
स्थानिक विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी हे सर्व प्रयत्न मा.श्री.मधुर गुप्ता यांच्या दूरदृष्टीतून आणि मार्गदर्शनातून साकार झाले आहेत. त्यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले हे केंद्र युवकांसाठी रोजगार व करिअरच्या नव्या संधी निर्माण करणारे ठरणार आहे.

“आज कौशल्य निर्माण करणे, उद्यासाठी संधी निर्माण करणे” या घोषवाक्यासह सुरू झालेल्या या उपक्रमामुळे घुग्घुस परिसरातील अनेक युवकांना कौशल्याधारित शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!