Home वर्धा जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 23 जणांवर गुन्हा दाखल 

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 23 जणांवर गुन्हा दाखल 

0
31

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 23 जणांवर गुन्हा दाखल 

 

 

वर्धा / अर्पित वाहने 

वर्धा तालुक्यातील नविन कायगाव बसस्थानकाजवळ असलेल्या हॉटेल जय भवानी नाष्टा सेंटर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. 11 मे) दुपारी धाड टाकून 23 जणांना ताब्यात घेत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 4 व 5 अन्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

दुपारी सुमारे 3 वाजता छत्रपती संभाजीनगर – पुणे रोडवरील मौजे नविन कायगाव बसस्टँड परिसरातील हॉटेलमध्ये “झन्ना-मन्ना” नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. धाडीत एकूण ₹14,33,170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात ₹1,48,670 रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकल व चारचाकी वाहन, जुगार साहित्य, पत्यांचे 130 बॉक्स (प्रति बॉक्स ₹150) यांचा समावेश आहे.

 

या प्रकरणी पोहेकॉ शिवानंद बनगे (स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी क्रमांक 1 ते 22 हे जुगार खेळताना मिळून आले असून बोरुडे याने जागा उपलब्ध करून देऊन जुगार सुरू ठेवण्यास मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

 

राहुल राजेंद्र वाघमारे (35) रा. माळीचिंचोळा ता. नेवासा, सागर दशरथ कदम (36) रा. प्रवरासंगम, संतोष राजाराम घुसळकर (46) रा. सोनई ता. नेवासा, बाबासाहेब कचरु खाजेकर (65) रा. गंगापुर, गोपीनाथ गोविंद पिटेकर (33) रा. हंडी निमगाव ता. नेवासा, राहुल विश्वास पंडीत (25) रा. घोडेगाव ता. शेवगाव, अविनाश अशोक मिसाळ (20) रा. अमळनेर, गोरख सुभाष हिवाळे (60) रा. भिवधानोरा, जगन्नाथ सोनाजी दुशिंग (50) रा. वाळुज, ज्ञानेश्वर पोपट औताडे (25) रा. बाभुळखेडा ता. नेवासा, नितीन प्रभाकर गायकवाड (54) रा. प्रवरासंगम, अकबर रशीद शेख (50) रा. कायगाव, राम मारुती काळे (42) रा. नेवासा फाटा, विश्वास दिलीप चंद्रनारायण (36) रा. नेवासा, ज्ञानेश्वर माने (45) रा. जामगाव, गणेश ठोंबरे (40) रा. जामगाव, दत्तात्रय गोरखनाथ मगरे (48) रा. नेवासा, सिताराम शंकर म्हस्के (58) रा. बंगलापुर ता. नेवासा, विष्णु साहेबराव लोहगळे (46) रा. भिवधानोरा, महेश जानकीराम ढवले (28) रा. नेवासा, छबु हौशीराम वाघाडीकर (50) रा. भेंडा ता. नेवासा, नितीन जगताप (40) रा. नेवासा, दिपक बोरुडे (43) रा. नविन कायगाव अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी क्रमांक 1 ते 22 जुगार खेळताना मिळून आले असुन. वरील गुन्हा दिनांक 11 मे रोजी रात्री 10.39 वाजता नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोना व्ही. बी. जाधव करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!