Home चंद्रपूर उन्हाळ्यात पाणी पाजणे हेच पुण्य कर्म – निशाद जूलफिकार अन्सारी

उन्हाळ्यात पाणी पाजणे हेच पुण्य कर्म – निशाद जूलफिकार अन्सारी

0
89

उन्हाळ्यात पाणी पाजणे हेच पुण्य कर्म – निशाद जूलफिकार अन्सारी

 

निलजई उपक्षेत्रात पाणपोईचे उद्घघाटन 

 

दामिनी महिला मंडळाचा उपक्रम

 

घुगुस प्रतिनिधी:-पाणी हेच जीवन आहे कडाक्याच्या उन्हाळ्यात तहानलेल्या नागरिकांना शुद्ध व थंड पाणी पाजणे किंवा त्याची सुविधा उपलब्ध करून देणे याच्यासारखे दुसरे पुण्य कर्म नाही असे प्रतिपादन निषाद जूलफिकार अन्सारी यांनी केले .

वेकोली वनी क्षेत्राच्या निलजई उपक्षेत्रात दामिनी महिला मंडळातर्फे थंड पाण्याच्या पाणपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली .या पाणपोईचे उद्घघाटन निशाद अंसारी यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कार्मिक प्रबंधक हृदय लधयांनी, सुनीता पवार, प्रीती शर्मा, जानकी राय, शीला यादव, मंजू बोरडे आदी मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.

चंद्रपूर जिल्ह्यात पारा 44 अंशाच्या वर पोहोचलेला असून या उकाड्याने नागरिक प्रभावित झाले आहे. वेकोली क्षेत्रातील कामगारांना सुद्धा हा उकाडा असह्य होत असून त्यांच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांना थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे हे उद्दिष्ट समोर ठेवून दामिनी महिला मंडळातर्फे निलजर्ई उपक्षेत्रात थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पाणपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या सुविधेचा लाभ क्षेत्रातील वेकोली कामगारांनी तथा परिसरातील नागरिकांना होईल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमाचे संचालन प्रफुल ईखारे यांनी तर उपक्रमाच्या यशस्वीते करिता राज जाधव, सुनील बिपटे यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!