धुरमुक्त ची सवय लावून महिलांना पेटवाया लावली परत धूरभरी चूल
चामोर्शी येथे गॅस सिलिंडर चा मोठा तुटवडा अरिहंत गॅस एजन्सीचा गोडाऊन कुलूप बंद अवस्थेत…
सामान्य गॅस ग्राहक मात्र मोठ्या विवंचनेत…
गडचिरोली जिल्हा सहपालकमंत्री ऍड. आशिष जयस्वाल तथा प्रशासन म्हणतेय की गॅस तुटवडा नाही..!
चामोर्शी, सुखसागर झाडे
शहरातील तसेच तालुक्यातील गॅस ग्राहक अरिहंत गॅस एजेंन्सी अंतर्गत गॅस सिलिंडर बुकिंग करीत आहेत.
गॅस बुक होवून ओ. टी. पी. सुद्धा मिळुनही ग्राहकांना एक हफ्ताभर पुरवठा अरिहंत गॅस एजन्सी कडून होत नाही.
जिल्हा सहपालकमंत्री ऍड. आशिष जयस्वाल तसेच प्रशासन आवर्जून ठामपणे सांगतात कीं, गॅस तुटवडा मुद्दाम नाही असे असताना सामान्य ग्राहकांची कोंडी कुणाकडून होतेय.
याला जबाबदार कोण? असा प्रश्न सामान्य गॅस ग्राहकांना पडला आहे.
अरिहंत गॅस एजन्सी कडून सांगण्यात येते कीं कंपनी कडूनच पुरेसा पुरवठा होत नाही, चार ते पाच गाड्यांची बुकिंग असताना संबंधित गॅस कंपनी कडून फक्त एक गाडी गॅस सिलेंडर पुरवठा होतो, त्यामानाने ऑनलाईन बुकिंग चे प्रमाण या मध्ये तफावत आहे अश्या परस्थितीत ग्राहकांना गॅस पुरवठा करताना नाहक त्रास सहन करावा लागतो.
घरगुती गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली असून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली विशेष तपासणी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण ११२ ठिकाणी तपासण्या व छापे टाकण्यात आले होते.
या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते
या धडक कारवाईदरम्यान प्रामुख्याने व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर तसेच अनधिकृत साठवणूक यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला असताना मग गॅस चा काळा बाजार करणाऱ्यावर भय कुणाचे राहिले कीं नाही असे जन सामान्य गॅस ग्राहक नागरिकांचे म्हणणे आहे.
उज्वला गॅस मोहिमेतून हर घर गॅसचे वितरण करण्यात आले. शहरी तथा ग्रामीण स्त्रियांना धुरमुक्त केले पण नियोजन मात्र आता शून्य झाल्याने गॅसमुळे हाहाकार माजला आहे. महिलानां आता परत चूल पेटवायला लावल्यामुळे महिलामध्ये तीव्र नाराजीचा सूर व्यक्त होताना प्रत्यक्ष दर्शनी प्रत्यय येत आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गॅस सिलिंडरचा काळाबाजार, अवैध साठवणूक किंवा व्यावसायिक वापर आढळल्यास नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा दिला असून जिल्ह्यात ही तपासणी मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.









