Home गडचिरोली सरळ सेवा विभागीय केंद्रप्रमुख परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन

सरळ सेवा विभागीय केंद्रप्रमुख परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन

0
119

सरळ सेवा विभागीय केंद्रप्रमुख परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन

निलेश मानापुरे जिल्हा टॉपर स्टेट रँक 214 घेत चामोर्शी तालुक्याच्या शिरपेचात रोवीला मानाचा तुरा

पंचायत समिती सभागृहात उज्वल यश संपादित शिक्षकांचा गट विकास अधिकारी यांच्या हस्ते सत्कार

 

चामोर्शी, सुखसागर झाडे :-नुकत्याच झालेल्या सरळ सेवा विभागीय केंद्रप्रमुख परीक्षेमध्ये चामोर्शी तालुक्यातील बारा शिक्षकांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, तर पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत जि. प. उच्च. प्रा. शाळा जामगिरी येथील सहा. शिक्षक निलेश प्रभाकर मानापुरे जिल्हात प्रथम, तसेच जि. प.उ.प्रा.शाळा वेलतूर तुकूम येथील सहा. शिक्षक प्रदीप भुरसे जिल्ह्यात तृतीय क्रमांक घेत यानी जिल्ह्यात पंचायत समितीचे नावंलौकिक केले तर जि. प. उ. प्रा. शाळा भिवापूर संजय लोणारे , प्रीती नवघडे जि. प. कन्या शाळा कुणघाडा रै , मारोती आरेवार मोहर्ली मो.या शिक्षकांची राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा पंचायत समिती सभागृहात उत्साहपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सहाय्यक गटविकास अधिकारी माधुरी येरमे, गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी मान्यवरांनी सत्कारमूर्ती शिक्षकांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या यशातून इतर शिक्षकांनीही प्रेरणा घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन केले. तसेच ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेच्या उन्नतीसाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला व उपस्थितांनी शिक्षकांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!