Home चंद्रपूर नगराध्यक्षांचा सत्कार समारंभ…

नगराध्यक्षांचा सत्कार समारंभ…

0
160

नगराध्यक्षांचा सत्कार समारंभ…

घुग्घुस :- 18 मार्च 2026
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालीत प्रियदर्शिनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घूस ता. जि. चंद्रपूर येथे घुग्घुस नगर परिषदच्या नगराध्यक्षा सौ. दिप्तीताई सुजित सोनटक्के, उपनगराध्यक्ष श्री. राजुभाऊ रेडडी, बांधकाम सभापती श्री.रोशनजी पचारे, स्विकृत सदस्य तौफीक शेख, रोहीत डाकूर,सैय्यद अनवर, रोशन दंतलवार यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्या अनू चोथे, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वैशाली जोशी, सुनिल म्हैस्के यांची उपस्थिती होती. नगराध्यक्षा दिप्तीताई सोनटक्के, श्री राजूभाऊ रेडडी, रोशन पचारे यांनी विदयार्थीनींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन बलवंत विखार यांनी तर आभार प्रदर्शन संजय माहुरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!