Home गडचिरोली चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह अवकाळी वादळी पाऊस

चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह अवकाळी वादळी पाऊस

0
129

चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह अवकाळी वादळी पाऊस

अवकाळी वादळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

चामोर्शी, सुखसागर झाडे:-हवामानात अचानक बदल झाले असून एकीकडे उष्णतेची लाट सुरू असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली.
हवामान खात्याने राज्यातील काही भागात 17 ते 20 मार्च असे 4 दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती. चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात 18 मार्च रोजी पहाटे साडेचार वाजतापासून वादळी पावसाने हजेरी लावली. विजेचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने बऱ्याचं भागातील बत्ती गुल झाली.

अचानक वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकांचे मक्का पिकांचे मोठं नुकसान झाले.
चामोर्शी तालुक्यातील बहुतांश भागात शेतकरी दुबार पीक म्हणून मक्का इतर पिकाची लागवड केली आहे.
मक्का पीक आता शेतकऱ्यांच्या पदरी येण्याची वेड असताना निसर्गानी अशी किमया केली. त्याचप्रमाणे तूर लाकोरी व इतर कडधान्य वेचणी चे कामं सुरु आहेत अश्या पिकांची सुद्धा मोठी नासधूस झाल्याने अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना चक्क हैराण केलं आहे. आशावादी शेतकरी आता हवालदिल झाला आहे.

ज्या भागातील पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले त्याचे महसूल विभागामार्फत तात्काळ मोका चौकशी करीत पंचनामा करून शासन स्तरावरून नुकसान भरपाई मिळेल का? या केवीलवाण्या आशेने माय-बाप शेतकरी बघत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!