Home गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर पेसा कंत्राटी शिक्षकांचे बेमुदत आंदोलन

जिल्हा परिषदेसमोर पेसा कंत्राटी शिक्षकांचे बेमुदत आंदोलन

0
77

जिल्हा परिषदेसमोर पेसा कंत्राटी शिक्षकांचे बेमुदत आंदोलन

आंदोलनास काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची भेट

गडचिरोली, सुखसागर झाडे : अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व मागासवर्गीय आदिवासी भागातील वाडी-वस्तीतील मुलांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या पेसा कंत्राटी शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनाला जिल्हाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भेट देऊन आंदोलक शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी शिक्षकांनी ५०% खुल्या प्रवर्गातील जागांवर प्रथम प्राधान्य,शिक्षक सेवक पद लागू करा, मागील सेवा ग्राह्य धरा अश्या प्रमुख मागण्या व आपल्या सेवा अटी, मानधन, स्थैर्य आणि इतर मूलभूत सुविधांबाबतच्या अडचणी मांडल्या.
महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून रास्त मागण्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली तसेच, आदिवासी व दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशीही मागणी उपोषण करते कंत्राटी शिक्षकांनी केली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, तालुकाध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम, विपुल येलटीवार, देवराव चवळे, अरविंद शेडमाके, रणजीत उंदीरवाडे, सारिका शेडमाके, लोकेश बारसागडे, नीलिमा राऊत, जितेंद्र सहारे, कविता देवीकर यांच्यासह शेकोडोच्या संख्येने आंदोलनकर्ते कंत्राटी शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!